Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी : आ. राजूमामा भोळे
    जळगाव

    अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी : आ. राजूमामा भोळे

    editor deskBy editor deskOctober 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    येथील श्री राधाराणी सेवा समिती आणि आ. राजूमामा भोळे यांचे सहकार्याने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शहरात डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेला दि. १६ ते २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत खान्देश सेंट्रल येथील मैदानात सुरुवात झाली आहे. भाविकांनी कथाश्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले आहे. सकाळी ९ वाजता गोलाणी मार्केट येथून कलश यात्रा भाविकांच्या उत्साहात काढण्यात आली.

    प. पू. इंद्रदेवेश्वरानंद गुरुजींना राष्ट्रीय स्तरावर यज्ञपिठाधीश्वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. इंद्रदेवेश्वरानंद महाराज यांचे अनमोल प्रवचन जळगाव शहरवासीयांना ऐकायला मिळणार आहे. या अद्भुत पर्वणीवर जळगावकरांना उपस्थित राहून कथा श्रवण करण्याची संधी मिळत आहे. सकाळी ९ वाजता गोलाणी मार्केट येथून कलशयात्रा आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. महिला भाविकांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन व पारंपरिक पेहराव करून भगवान महादेवाचा जयघोष केला.

    कलशयात्रा हि गोलाणी मार्केट येथून कथास्थळी खान्देश सेंट्रल येथील मैदानात समाप्त झाली. यानंतर डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. पहिल्यादिवशी महाराजांनी भगवान शिव महिमा सांगितला. तसेच, महादेव भक्तीची महती सांगितली. प्रसंगी शहरातील अनेक कानाकोपऱ्यातून भाविकांनी उपस्थिती दिली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बदलापूर पुन्हा हादरले : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

    January 23, 2026

    राजीव गांधी नगरात तरुणावर दगडाने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    January 23, 2026

    डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.