

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व
विजय पाटील जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या टप्प्यावर राजकीय घडामोडींना वेग आला असून मनव विकास सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर विविध मतदारसंघांतील उमेदवारांच्या माघारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यात मनव विकास सोसायटी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराची माघार महत्त्वपूर्ण ठरली आहे. भाजपचे प्रफुल्ल पवार यांनी माघार घेतल्याने जयश्री पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.



