Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जन्मदाताच बनला मुलांचा वैरी : चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले!
    क्राईम

    जन्मदाताच बनला मुलांचा वैरी : चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले!

    editor deskBy editor deskNovember 18, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    जन्म देणाऱ्या पित्यानेच आपल्या पोटच्या दोन निष्पाप मुलांना मृत्यूच्या दाढेत ढकलल्याची मन हेलावून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली आहे. चॉकलेट आणि वडापाव खायला देण्याचे आमिष दाखवून फिरायला नेण्याच्या बहाण्याने पित्यानेच आपल्या दोन चिमुकल्यांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नांदर परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, कालव्यात ढकलले जात असताना मुलांनी ‘पप्पा, नको ना…’ अशी आर्त विनवणी केली. मात्र, पित्याचे मन पाझरले नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, श्याम (5) आणि आर्यन (7) अशी या दुर्दैवी बालकांची नावे आहेत. सोमवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडील सोमनाथ रोडगे यांनी दोन्ही मुलांना फिरायला जाण्याचे सांगितले. चॉकलेट आणि वडापाव खायला देण्याचे आमिष दाखवत त्यांनी मुलांना दुचाकीवर बसवले. सुरुवातीला मुलांनाही वडिलांसोबत बाहेर जाण्याचा आनंद वाटला असावा. मात्र, त्यांना घेऊन जाताना पित्याच्या मनात नेमके काय सुरू होते, याची कल्पनाही त्या चिमुकल्यांना नव्हती.

    सोमनाथ रोडगे यांनी दोन्ही मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ नेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी मुलांना कालव्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या मुलांनी वडिलांना विरोध करत बाहेर पडण्याची विनंती केली. ‘पप्पा, नको ना… आम्ही खाली पडू लागेल…’ अशा शब्दांत त्यांनी वडिलांकडे आर्जव केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या आर्त विनवणीचाही आरोपीवर कोणताही परिणाम झाला नाही. अखेर त्याने दोन्ही मुलांना कालव्याच्या पाण्यात फेकून दिल्याचा आरोप आहे.

    हा सर्व प्रकार कालव्यावरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी आलेल्या काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. मुलांना कालव्यात फेकले जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी सोमनाथ रोडगे याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने शेतकऱ्यांनाच विरोध केला. प्रत्यक्षदर्शींवर दगडफेक करत शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पाचोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत घटनेबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही मुलांना कालव्यात फेकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या कृत्यामागे नेमके काय कारण होते, त्याने मुलांना कालव्यात फेकण्याचा निर्णय का घेतला आणि या घटनेपूर्वी काही कौटुंबिक वाद झाला होता का, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

    दुसरीकडे, कालव्यात फेकण्यात आलेल्या श्याम आणि आर्यन या दोन्ही बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह नातेवाईकांनी रात्रीपासून प्रयत्न सुरू केले आहेत. जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. कालव्याच्या प्रवाहामुळे मुले नेमकी कुठपर्यंत वाहून गेली असतील, याचा अंदाज घेऊन शोध घेतला जात आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत दोन्ही बालकांचा शोध लागलेला नव्हता. एकीकडे मुलांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या जन्मदात्या पित्यानेच त्यांच्याबाबत असे टोकाचे आणि क्रूर कृत्य केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अवघ्या 5 आणि 7 वर्षांच्या या चिमुकल्यांना आपल्या वडिलांकडूनच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याची कल्पनाही नव्हती. आता या घटनेमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार असून, दोन्ही बालकांचा शोध लागण्याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात संतापजनक घटना : चुलत मामाचे बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक !

    November 18, 2026

    गोलाणी मार्केट हादरले : चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी; मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात !

    November 18, 2026

    विजेच्या खांबावर चढणे ठरले जीवघेणे : तरुण ४० टक्के भाजला

    November 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.