Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात तलवारींचा धाक अन् गोळीबाराचा थरार : तरुणाच्या घरासमोर दोन राऊंड फायरिंग !
    क्राईम

    जळगावात तलवारींचा धाक अन् गोळीबाराचा थरार : तरुणाच्या घरासमोर दोन राऊंड फायरिंग !

    editor deskBy editor deskNovember 18, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दुचाकीवरुन तलवारी घेवून आलेल्या टोळक्याने केयूर पंधारे (रा. शिवाजी नगर) या तरुणाच्या घरासमोर हवेत गोळीबार केला. ही घटना मंगळवार दि. १७ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी रिकामी पुंगळी मिळून आली नाही, मात्र परिसरातील नागरिकांनी गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला असून दोन वेळा फायर झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार झालेल्या घरावर लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरुन संशयित हल्लखोरांच्या कसून शोध घेतला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,   शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकात केयूर पंधारे हा तरुण वास्तव्यास आहे. त्याचे वडील महापालिकेत नोकरीस असून ते ड्युटीवर ते ड्युटीवर होते तर केयूर हा बाहेर गेलेला होता, दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकीवरून सहा ते सात तरुण त्याच्या घराजवळ हातात धारदार तलवारी घेवून आले. त्यांनी पंधारे यांच्या घरासमोर त्यांच्याजवळील गावठी कडूयातून हवेत दोन राऊंड फायर केले. त्यानंतर संशयित टोळके घटनास्थळहून पसार झाले. गोळीबार झाल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ माजून गेली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

    घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी काडतूसांचा शोध घेतला जात होता. त्यानंतर फॉरेन्सीकच्या पथकाने देखील घटनास्थळहून काडतूसांचा शोध घेवून पंचनामा करण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागात हवेत दोनवेळा गोळीबार झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबाराच्या घटनेला पोलिसांनी देखील दुजोरा दिला असून पुढील तपास सुरू आहे.

    ज्या तरुणाच्या घरावर गोळीबार झाला त्याच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलिसांनी गोळीबार करण्यासाठी आलेल्यांचे फुटेज ताब्यात घेतले. यामध्ये टोळक्याच्या हातात तलवारी आणि गावठी कट्टा असल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्याच्या आधारावर पोलिसांकडून संशयित टोळक्याचा शोध घेतला जात असून त्यांच्या शोधार्थ पथके देखील रवाना झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात संतापजनक घटना : चुलत मामाचे बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक !

    November 18, 2026

    गोलाणी मार्केट हादरले : चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी; मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात !

    November 18, 2026

    विजेच्या खांबावर चढणे ठरले जीवघेणे : तरुण ४० टक्के भाजला

    November 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.