Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी चोरांची टोळी जेरबंद : दोघांना अटक; पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत !
    क्राईम

    दुचाकी चोरांची टोळी जेरबंद : दोघांना अटक; पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत !

    editor deskBy editor deskNovember 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरुन करुन त्याची कमी किंमतीमध्ये विक्री करणाऱ्या निर्मल राजेंद्र ठाकूर (रा. कांचननगर) व मनोज मोहन रंधे (रा. नशिराबाद, ता. जळगाव) या दोघांच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

    पिंप्राळा परिसरातील रथ चौकातून बापू दत्तू कोळी यांची (एमएच १९, बीई ८१६१) क्रमांकाची दुचाकी घरासमोरुन चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी चोरट्याच्या शोधार्थ गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत योगेश बारी, मनोज मराठे, सुमेध इंधाटे, मुकुंद गवते, सागर नन्नवरे यांचे पथक रवाना केले.

    या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपास ही चोरी निर्मल ठाकूर याने केल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी कांचन नगरातून संशयित निर्मल ठाकूर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदार मनोज रंधे याच्या मदतीने आणखी काही ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी जळगाव शहरातील पिंप्राळा, ईच्छादेवी व चोपडा शहरातून चोरलेल्या पाच दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लग्नसमारंभात वाद, पाठीत चॉपरचा वार अन् तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

    November 20, 2026

    २८ वर्षीय बाळू पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; बाळद परिसरात हळहळ

    November 19, 2026

    रत्ना अपार्टमेंटमध्ये कौटुंबिक वादाचा भडका : विवाहितेला ढकलून घराबाहेर काढले; जेठाविरुद्ध गुन्हा

    November 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.