Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २८ वर्षीय बाळू पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; बाळद परिसरात हळहळ
    क्राईम

    २८ वर्षीय बाळू पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; बाळद परिसरात हळहळ

    editor deskBy editor deskNovember 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा  : प्रतिनिधी 

    तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील रहिवासी बाळू प्रकाश पाटील (वय २८) यांनी १६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे बाळद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिलोलेल्या  माहितीनुसार,  बाळद बुद्रुक येथील रहिवासी बाळु पाटील यांनी १६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही माहिती कुटुंबीयांना कळताच त्यांनी व गावातील पोलिस पाटील नितीन पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्र सोमवंशी यांनी तातडीने नगरदेवळा पोलीस ठाणे व पाचोरा पोलिसांना माहिती दिली. पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, पठाण व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, बाळू पाटील यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पाचोरा पोलीस तपास करत आहेत. मयत बाळू पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे बाळद बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रत्ना अपार्टमेंटमध्ये कौटुंबिक वादाचा भडका : विवाहितेला ढकलून घराबाहेर काढले; जेठाविरुद्ध गुन्हा

    November 19, 2026

    डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे : एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा मृत्यू !

    November 19, 2026

    मृत महिलांच्या नावाने बनावट कागदपत्रे? मेहरुणमधील जमीन हडप प्रकरणी ६ जणांवर गुन्हा!

    November 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.