जळगाव : प्रतिनिधी
काहीही कारण नसताना दुकानावर येऊन राजू रामदेव प्रजापत (वय ३८, रा. अरिहंत कॉलनी) या व्यावसायिकास एका जणाने शिवीगाळ करीत लोखंडी रॉड सारखी वस्तू डोक्यात मारली. या वेळी व्यावसायिकाच्या वडिलांनादेखील शिवीगाळ करण्यात आली. ही घटना गुरुवार दि. १८ जुलै कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य मार्केट परिसरात असलेल्या दकानावर राजू प्रजापत हे गेले त्या वेळी तेथे गणेशवाडीतील एका जणाने येऊन त्यांना शिवीगाळ केली. व्यावसायिकाचे वडील तेथे आले असता त्यांनाही त्याने शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉडसारखी वस्तू व्यावसायिकाच्या डोक्यात मारली. दोघांना दोन ते तीन महिन्यात जिवेठार मारेल, अशी धमकी त्याने दिली. या प्रकरणी राजू प्रजापत यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिवीगाळ करणाऱ्याविरुद्ध कलम ११८ (१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत जाधव करीत आहेत.