Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड
    क्राईम

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    editor deskBy editor deskApril 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    फैजपूर शहरातील पिंपरुड रोडवर असलेल्या ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकला. गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल १०० भरलेले गॅस सिलिंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एजन्सीचे संचालक ललित रघुनाथ राणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ललित राणे यांचे पिंपरुड शिवारात १२,००० किलो क्षमता असलेले भारत गॅसचे अधिकृत गोदाम आहे. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास राणे यांच्या पत्नी मृणाल आणि कर्मचारी दामोदर असटकर यांनी गोदाम व्यवस्थित बंद केले होते. त्यावेळी गोदामात घरगुती वापराचे १४.२ किलोचे २०९ भरलेले सिलिंडर साठवून ठेवलेले होते. शनिवारी (दि. २५) सकाळी ८:३० वाजता एजन्सीचा कर्मचारी विशाल कोचुरे हा गोदाम उघडण्यासाठी गेला असता, त्याला मुख्य गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने तातडीने मालक ललित राणे यांना या घटनेची माहिती दिली. राणे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली असता, गोदामाचा कोंडा तोडलेला आढळला आणि आत साठवलेल्या सिलिंडरपैकी १०० सिलिंडर गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, चोरी गेलेल्या एका सिलिंडरची किंमत ३,११८ रुपये असून, एकूण ३,११,८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. भरलेले १०० सिलिंडर नेण्यासाठी चोरट्यांनींनी निश्चितच मोठ्या वाहनाचा वापर केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

    भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यालगत असलेल्या गोदामातून इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर चोरीला गेल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अज्ञात चोरट्याांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि इतर धागेदोरे शोधत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.