Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !
    क्राईम

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskApril 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात रात्रीच्या वेळी घरात घुसून १० वर्षीय बालिकेचे तोंड दाबून तिच्या २६ वर्षीय चुलत भावानेच तिचा विनयभंग केला. नात्याला काळिमा फासणारा हा धक्कादायक प्रकार दि. ३० मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात -तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबातील १० वर्षीय बालिका घरात असताना रात्रीच्या वेळी तिच्या चुलत भावाने घरात प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा लावून बालिकेचे तोंड दाबले व तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकेल, अशी धमकीदेखील तरुणाने दिली. यामुळे सदर बालिका भयभीत झाली होती. हा प्रकार तिने दि. २४ एप्रिल रोजी घरातील सदस्यांना सांगितला. त्यावेळी तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.