जळगाव : प्रतिनिधी
शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी ४५ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करणारे कंत्राटदार अजय भागवत बढे यांना सोमवारी (१५ जुलै) तापी महामंडळाचे सेवानिवृत्त अभियंता तथा माजी विभागीय माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांच्या नावाने धमकावण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या पंकज वासुदेव नेमाडेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी सकाळी बढे यांच्या मोबाईलवर ‘व्ही.डी. पाटील यांना चांगले ओळखतात, तुम्ही जे केले त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. नंतर नेमाडे याने तो मेसेज डिलिट करून टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.