जळगाव : प्रतिनिधी
महिलेचा विनयभंग करत तिला शिवीगाळ करण्यासह जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १२ जुलै रोजी घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गंगाधर सपकाळे (३५) हा अश्लील हावभाव करत वीट घेऊन महिलेच्या अंगावर धावत गेला. महिलेची आई समजावण्यासाठी गेली असता, तिलादेखील त्याने शिवीगाळ केली. घरात घुसून सर्वांना मारून टाकू अशी धमकी दिली. रमेशचे वडील गंगाधर भिवसन सपकाळे यांनीसुद्धा शिवीगाळ केली. महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रमेश सपकाळे व गंगाधर सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.