Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गोरक्षकांनी पोलिसांना पकडून दिला पारडूची वाहतूक करणारा ट्रक !
    क्राईम

    गोरक्षकांनी पोलिसांना पकडून दिला पारडूची वाहतूक करणारा ट्रक !

    editor deskBy editor deskDecember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

    कंटेनरमधून निर्दयतेने ५४ म्हशींचे पारडू (हेला) कोंबून नेताना तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळ एक टँकर मुक्ताईनगर तालुका गोरक्षकांनी बुधवारी दि.६ दुपारी पोलिसांना पकडून दिला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एक दिवसाची पोलिस कोठडी त्यांना दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळून दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कंटेनर (आरजे ११- जीबी ९४८७) जात असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी कंटेनर थांबवून त्यामध्ये काय आहे, याची पाहणी केली. तेव्हा कंटेनरमध्ये सुमारे दोन वर्ष वयाचे ५४ म्हशीचे पारडू कोंबून घेऊन जाताना आढळले. कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा परवानाही नव्हता पोलिसांनी हे दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे म्हशींचे ५४ पारडू व दहा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा १२ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पारडूंना तालुक्यातील हरताळा येथील गोशाळेत दाखल केले आहे. पो. कॉ. राहुल बेहेनवाल यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद अहसाल मोहम्मद अब्दुल गफार (रा. फिरोजपूर, जि. मेवाल, हरयाणा) आणि आजम खान अब्दुल हमीद (रा. बुरारखा, जि. मेवाल, हरयाणा) यांच्याविरुद्ध प्राण्यांना निर्दयीपणे वाहून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि. नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विजय पढार करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.