Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिवाळीत खाद्यतेलाचा काळाबाजार? एफडीएच्या छाप्यात ७.६५ लाखांचे तेल जप्त!
    क्राईम

    दिवाळीत खाद्यतेलाचा काळाबाजार? एफडीएच्या छाप्यात ७.६५ लाखांचे तेल जप्त!

    editor deskBy editor deskNovember 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दिवाळीच्या सणासुदीत नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असणाऱ्या तेल कंपन्यांवर अचानक छापा टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका कंपनीतील ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४४२५ किलो तेल जप्त करून सील करण्यात आले.

    सध्या दिवाळीमुळे खाद्यतेलाची मागणी वाढली आहे. याचा गैरफायदा घेऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी एफडीएच्या पथकाने जळगाव एमआयडीसीतील ७ प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांची कसून तपासणी केली. एका कंपनीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ४,४२५ किलो तेलाचा साठा जागेवरच जप्त केला. ही संपूर्ण कारवाई अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिदि यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, किशोर साळुंखे आणि आकाश बोराडे यांच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, जप्त आणि सील केलेला साठा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत वापरता येणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पठाणबाबा टेकडीवर वणव्याचे रौद्ररूप : शेकडो एकर गवत खाक; दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात!

    November 9, 2026

    मध्यरात्रीच्या आगीने कुटुंबाचे मोठे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे घरातील संसारोपयोगी वस्तू खाक!

    November 9, 2026

    जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांची आपसात हाणामारी !

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.