

जळगाव : प्रतिनधी
शॉर्ट सर्कीटमुळे राजेश लड्डूमल सिंधी (वय ५८, रा. समाधा नगर, सिंधी कॉलनी) यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता सिंधी कॉलनीतील गंगासागर अपार्टमेंट मध्ये घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील सिंधी कॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटमध्ये राजेश सिंधी हे वास्तव्यास आहे. दि. नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात शॉर्ट सर्कीट होवून अचानक फ्रिजजवळ आग लागली. या आगीत घरातील फ्रिज, पंखा, टिव्ही, कॅटल्स, ओव्हन, केन्ट वॉटर फिल्टर, मोबाईल, लॅपटॉप, ए. सी., फर्निचरसह घरातील महत्वाच्या कागदपत्रांसह संपुर्ण संसारपयोगी वस्तू व पैसे जळून खाक होवून नुकसान झाले. याप्रकरणी दि. ७ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात राजेशी सिंधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.



