Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पठाणबाबा टेकडीवर वणव्याचे रौद्ररूप : शेकडो एकर गवत खाक; दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात!
    क्राईम

    पठाणबाबा टेकडीवर वणव्याचे रौद्ररूप : शेकडो एकर गवत खाक; दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात!

    editor deskBy editor deskNovember 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरालगत असलेल्या पठाणबाबा दर्गा परिसरातील टेकडीवर आग लागून शेकडो एकरवरील गवत जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबानी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले.

    शहरातील पठाणबाबा दर्गा परिसरातील टेकडीवरील गवताला रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग वाऱ्यामुळे पसरत जाऊन कुंभारखोरीपर्यंत वाढत गेली, तसेच वेगवेगळ्या परिसरात पसरली. यात शेकडो एकरवरील गवत जळून खाक झाले. तसेच सरपटणाऱ्या प्राणी, पशुपंक्षांना इजा झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. मुख्य अग्नीशमन अधिकारी अश्वजित घरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आग विझविली. जवळपास दीड तासानंतर आग नियंत्रणात आली. सोबतच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आग विझविली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी एकतर पेटता फटाका उडाल्याने अथवा कोणीतरी पेटती बिडी, सिगारेट फेकल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दिवाळीत खाद्यतेलाचा काळाबाजार? एफडीएच्या छाप्यात ७.६५ लाखांचे तेल जप्त!

    November 9, 2026

    मध्यरात्रीच्या आगीने कुटुंबाचे मोठे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे घरातील संसारोपयोगी वस्तू खाक!

    November 9, 2026

    जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांची आपसात हाणामारी !

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.