Author: editor desk

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था भाजप आमदार संजय केनेकर यांच्या क्रांती चौकातील संपर्क कार्यालयात आज सकाळी एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात एका बॅगेत पिस्तुलासारखी वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, काल सायंकाळी अज्ञात व्यक्तीने ही बॅग कार्यालयात ठेवली होती. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना वाटले की ही बॅग कुणी विसरली असेल, परंतु सकाळपर्यंत कोणताही संपर्क झाला नाही. संशय आल्यावर बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये पिस्तुल आढळल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय केनेकर यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी धाव घेत बॅग आणि तिच्यातील वस्तू ताब्यात घेतली. प्राथमिक तपासात हे पिस्तुल प्रत्यक्षात एअरगन असल्याचे स्पष्ट झाले, तरीही सुरक्षेच्या दृष्टीने…

Read More

शिरूर : वृत्तसंस्था शिरूर तालुक्यातील न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांसह त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे निमोणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी कार आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात पवन राजहंस काळे (वय ३८), त्यांची मुलगी…

Read More

मालेगाव : वृत्तसंस्था  नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी महापालिका मुख्यालयातील आपल्या दालनात टिपू सुलतान  यांचा फोटो लावल्याने शहरात तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अखेर शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारपर्यंत सामोपचाराने संबंधित फोटो काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर सेना पदाधिकारी व नगरसेवक परतले. महापालिका मुख्यालयात महापौर व उपमहापौर यांची स्वतंत्र दालने आहेत. उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आल्याचा फोटो शुक्रवारी सकाळपासून समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यावरून राजकीय वाद पेटला. दुपारी शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या कार्यालयात धडक देत शासकीय इमारतीतील प्रोटोकॉलनुसार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, मंगळवारी १० फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी शनीपेठ पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कालंका माता चौफुलीजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत प्रभाकर पाटील (वय ५५, रा. तेली चौक) या हातमजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे शुक्रवारी रात्री कामावरून परतताना त्यांनी भाजीपाला खरेदी केला व ते पायी घराकडे निघाले होते. मात्र, कालंका माता चौफुलीजवळ भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते चाकाखाली आले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडत महामार्गावर रास्तारोको केल्याने तणाताचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. याच ठिकाणी वर्षभरापूर्वी एका मुलीचाही अपघाती मृत्यू झाला होता.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१४ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी मनःस्थितीसह एक अद्भुत दिवस असेल. संयम तुम्हाला नवीन उंची गाठण्यास मदत करेल. तुमच्या ऑटोमोबाईल व्यवसायात तुम्हाला नफा दिसेल. नवीन धार्मिक स्थळाला भेट देण्याचा आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल. ऑफीस सहकाऱ्यांसोबत आज सहलीला जाल. प्रशासकीय सेवांमध्ये सहभागी असलेल्या लोकांकडून तुम्हाला फायदा होईल. जवळच्या नातेवाईकांशी तुमचा संवाद वाढेल. आज तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्यास उत्साहित असाल. आज, तुमच्या प्रकल्पात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल, जो तुमच्या भविष्यातील यशासाठी उपयुक्त ठरेल. काही कल्पना मनात येऊ शकतात ज्या खरोखरच क्रांतिकारी आहेत. वृषभ राशी आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे एक आनंददायी वातावरण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित लाचप्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत नैतिकतेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध सिद्ध झाल्यास तात्काळ राजीनामा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. “जर माझी कोणतीही ‘लिंक’ आढळली, तर पदावर राहण्याचा प्रश्नच नाही,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. लाच घेताना रंगेहात पकडल्या गेलेल्या क्लर्क राजेंद्र ढेरे याच्याविषयी बोलताना झिरवाळ यांनी कायद्यापुढे सर्व समान असल्याचे अधोरेखित केले. संबंधित कर्मचाऱ्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई होईलच, तसेच विभागीय पातळीवर स्वतंत्र चौकशी करून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवारांच्या अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “हा घातपात असेल तर तो सिद्ध होईल आणि सिद्ध झाल्यास दोषींना शिक्षा मिळेल. तसेच अपघातासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यांचे निराकरणही व्हायला हवे,” असे ते म्हणाले. अजित पवारांच्या अपघातावर आमदार रोहित पवार यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. याबाबत विचारले असता पाटेकर म्हणाले, “रोहित पवारांनी काकांना गमावले आहे. त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांनी उपस्थित केले. त्या भावनेचा आदर केला पाहिजे.” नाना पाटेकर पुढे म्हणाले, “अजित पवार माझ्या लहान भावासारखे होते. आमची…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘शकुनी मामा’ अशी उपमा देत, महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप खोत यांनी केला. सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. खोत म्हणाले, जयंत पाटील यांच्या पांढऱ्या चेहऱ्यामागे ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारी दडलेली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राजकीय सूडबुद्धीने कारवाया करण्याचे प्रयत्न झाले, असा दावा त्यांनी केला. बागणी जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचा संदर्भ देताना खोत म्हणाले,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहर परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तनवीर ऊर्फ तन्या रहीम शेख (वय ३०, रा. गेंदालाल मिल) या तडीपाराला जळगाव शहर पोलिसांनी बुधवार, १० फेब्रुवारी रोजी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील गेंदालाल मिल भागातील साईबाबा मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. कानळदा रोडवर एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस कर्मचारी अमोल अशोक ठाकूर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी तनवीर याला उपविभागीय दंडाधिकारी जळगाव विभाग यांनी ७ फेब्रुवारी…

Read More