Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली असल्याच्या विधानावरून रविवारसकाळी पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावर संघर्ष झाला. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली, ज्यात काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले. घटनेनंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. या राडीत काही वाहनांचे नुकसान झाले, तर महिला पोलिसाही जखमी झाली. काँग्रेसने भाजपवर पोलिसांच्या पाठिंब्याने हल्ल्याचा आरोप केला आहे, तर भाजपने सपकाळच्या विधानावर टीका केली आहे. या प्रकरणी पुण्यात एका गुन्ह्याची नोंद झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दोन्ही पक्षांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था ‘बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासूनच मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले आहे. घृष्णेश्वर मंदिर येथे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. परराज्यांतूनही हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले असून संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमला आहे. वैद्यनाथ मंदिर, परळी येथे प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा पार पडली. दागदागिन्यांनी मढविलेल्या मूर्तीचे दर्शन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील कोट्यवधी रुपयांची रोकड बँकेत जमा न करता उपनिरीक्षक वाल्मिक मधुकर वाघ (वय ५७, रा. साईनगर, निमखेडी) हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्हा पेठ परिसरात पोलिस वेल्फेअर विभागामार्फत दक्षता पेट्रोलपंप चालविला जातो. येथे पेट्रोल विक्रीतून दररोज मोठ्या प्रमाणात रोकड जमा होते. नियमानुसार ही रक्कम दररोज हिशोब करून वेल्फेअर विभागाच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. सदर जबाबदारी उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, गेल्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रुग्णालयात दाखल असल्याची बनावट नोंद करून पॅथॉलॉजी लॅबमधून खोटे वैद्यकीय अहवाल तयार करत दिल्लीतील तरुणाच्या नावे वैद्यकीय विम्याची रक्कम परस्पर हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगावातील अजिंठा चौफुली परिसरातील टायटन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. इम्रान बी. नाईकवाडी तसेच जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबच्या व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली येथील तुघलकाबाद परिसरातील रहिवासी विजय संतराम गुप्ता (२५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना जळगावातील टायटन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे दाखविण्यात आले. तसेच जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबमधून त्यांच्या नावाचे वैद्यकीय तपासणी अहवाल तयार करून…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीत चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने जमीला कुरेशी यांच्या घरातील कपाट फोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धाडसी घरफोडी उघडकीस आली आहे. आठ दिवस घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. मिळालेल्या माहितीनुसार, जमीला रऊफ कुरेशी या ६ रोजी आईची प्रकृती बिघडल्याने बडनेरा येथे गेल्या होत्या. प्रकृती गंभीर असल्याने त्या तेथेच थांबल्या. दरम्यान, गुरुवारी त्यांनी मुलगी व जावयास घराची पाहणी करण्यास सांगितले असता मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश करताच दोन्ही खोल्यांचे कडी-कोयंडे तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. गॅस कटरने कपाटाचे कुलूप कापले एका खोलीतील पेटी फोडलेली तर दुसऱ्या खोलीतील कपाटांचे कुलूप तोडण्यात आले होते. विशेष…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१५ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज काहीतरी खास साध्य केल्याने तुमचे मनोबल वाढेल. आज कोणतीही गुंतवणूक करताना तुमच्या बजेटची काळजी घ्या. या राशीत जन्मलेल्या आणि नोकरी करणाऱ्यांना प्रगती होण्याची शक्यता आहे आणि तुमचे स्थलांतर देखील होऊ शकते. तुमच्या कुटुंबासमोर तुमचे विचार व्यक्त करण्याची तुम्हाला भरपूर संधी मिळेल. आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा. आज अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. नाहीतर मोठा फटका बसेल. वृषभ राशी आज तुम्हाला एकटे जास्त वेळ घालवण्यात आनंद मिळेल. तुमच्या योजना तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील. आज तुम्ही काहीतरी मोठे आणि वेगळे करण्याचा विचार करू शकता. या राशीच्या ज्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या  पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ‘ब्रेकिंग’ असा उल्लेख करत राऊत यांनी त्यांच्या अधिकृत खात्यावर व्हिडिओ पोस्ट केला. “विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे. तुम्ही सांगताय की मी सांगू?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस  आणि पंतप्रधान मोदी यांनाही टॅग केले आहे. व्हिडिओत नेमके काय? शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष हे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिका माता मंदिर परिसर आणि आजूबाजूचा भाग हा वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून ओळखला जात आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या भागात योगेश्वर नगर, जुने जळगाव, तळेले कॉलनी, शंकरराव नगर, तुळसाई नगर, प्रेमचंद नगर, ज्ञानदेव नगर, गीताई नगर, काशिनाथ नगर, जमुना नगर, सुंदर नगर, विठोबा नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, राम पेठ, मारुती पेठ आदींसह तब्बल ५० हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या परिसरात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सध्या दोन पोलिस ठाण्यांमध्ये विभागली गेली आहे — MIDC Police Station Jalgaon आणि Shanipeth Police Station. हद्दीच्या विभागणीमुळे गुन्हा घडल्यावर तो कोणत्या पोलिस ठाण्यात…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भरलेल्या प्रसिद्ध पशु मेळ्यात ‘कुबेर’ नावाच्या मुर्रा जातीच्या बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फतेहाबाद जिल्ह्यातील नागोडी गावातून आणलेला हा चार वर्षांचा बैल तब्बल २१ कोटी रुपयांच्या किंमतीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आकार, शरीरयष्टी आणि वंशपरंपरेमुळे कुबेरला मेळ्याचा निर्विवाद स्टार मानले जात आहे. कुबेरचे मालक विकास यांनी सांगितले की, राजस्थानमधील Pushkar Fair मध्ये ‘जगातील सर्वोत्तम आणि सर्वात महागडा बैल’ असा किताब मिळाल्यानंतर कुबेरची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्या मेळ्यानंतर त्याची किंमत २१ कोटी रुपयांवर पोहोचली. यापूर्वी त्याची किंमत ११ कोटी रुपये होती. अलिकडेच आंध्र प्रदेशातील एका इच्छुक खरेदीदाराने एका इटालियन मध्यस्थामार्फत २१ कोटी रुपयांची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी स्पष्ट केले की, पक्षाच्या दोन गटांचे विलीनीकरण सध्या त्यांच्या आघाडीवरचा विषय नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी म्हणाले, “रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे? ही चर्चा आज, महिन्याने किंवा दोन महिन्यांनी करता येईल. घाई करण्याची काहीही गरज नाही.” भुजबळांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे हलचाल झाले आहेत. शरद पवार गटाने 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा करण्याचा दावा केला होता, परंतु अजित पवार गटाने हा दावा फेटाळून लावला. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, सध्या पक्षाचे प्राधान्य सुनेत्रा पवार…

Read More