Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपचार न मिळाल्याने ८ वर्षीय मुलाचा मृत्यू !
    राज्य

    उपचार न मिळाल्याने ८ वर्षीय मुलाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskAugust 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    देशाला स्वतंत्र मिळवून कित्येक वर्ष झाले पण आज देखील महाराष्ट्रात असे गाव आहे ज्याठिकाणी आरोग्य केद्र असून देखील या ठिकाणी डॉक्टर नसल्याने एका ८ वर्षीय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हि घना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भवर पाडा येथे घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर नसल्याने त्याच्यावर उपचार झाले नाहीत. यामध्ये खूप वेळ वाया गेला. त्यानंतर त्यास नेण्यात आले. शहापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो दुसरीमध्ये शिक्षण घेत होता. रात्री झोपेत असताना तो रडायला लागला आणि तोंडातून फेस आला म्हणून त्याला अघई येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्याचे पालक त्याला घेऊन जाण्यासाठी भवरपाडा येथून निघाले. परंतु, गावात रस्ता नसल्याने अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ वांद्रे या गावापर्यंत येण्यासाठी लागला. रुग्णालयात पोहोचण्यासाठी किमान पाऊण तास असा उशीर झाल्याने या आदिवासी मुलाचा मृत्यू झाला. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांनी सांगितले की, मुलाच्या फुफ्फुसात रक्तस्राव झाला होता. तसेच याआधी इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

    वांद्रे आरोग्य केंद्रावर पोहोचल्यानंतर तेथे कोणीच वैद्यकीय अधिकारी नव्हते. मुक्कामी वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने मुलाला १३ किमी अंतरावरील अघई प्राथमिक आरोग्य केंद्रावर दुचाकीवरून नेले. तोपर्यंत पहाटेचे तीन ते चार वाजून गेले होते. त्याला एकदा उलटी झाली आणि तोंडातून फेस निघत होता. अघई येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. सकाळचे साडेपाच वाजून गेले होते.

    Aarogya Kendra
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.