Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : सप्तशृंगी पदयात्रेत काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय भाविकाचा मृत्यू
    क्राईम

    धक्कादायक : सप्तशृंगी पदयात्रेत काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय भाविकाचा मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 31, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी पायी गडावर जात असताना तालुक्यातील चौगाव येथील परेश धर्मा पवार (वय १७) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातील भेंडी गावात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे चौगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील चौगाव येथील २५ ते ३० भाविक २६ तारखेपासून पायी पदयात्रेतून वणी सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी निघाले होते. यात परेश धर्मा पवार हाहि पायी पदयात्रेत सहभागी होता. गडावर जात असतांना २९ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कळवण तालुक्यातील भेंडी येथे परेश पवार हा भंडाऱ्यात गेला होता. त्या ठिकाणी मंडपाच्या लोखंडी पाईपला त्याचा अचानक स्पर्श झाल्याने त्यास विजेचा जबर धक्का बसला, यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती मयत परेश पवार यांचे बंधू पंकज पवार यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ३० रोजी चौगाव या मूळ गावी परेश पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    याबाबत कळवण पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गडावर जातांना श्रद्धेपोटी अनेक जण भाविकांची जेवणाची व पाण्याची व्यवस्था करतात. सप्तशृंगी गड काही अंतरावर असताना रस्त्यावरील भेंडी येथे अशाच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी २९ रोजी सायंकाळी परेश पवार गेला असता त्यास विजेच्या धक्काने मृत्यू झाला. त्यामुळे गडावर जाण्यापूर्वीच सर्व भाविक घरी परतले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.