Author: editor desk

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारासह विनयभंगाच्या घटना घडत असताना आता नागपुरातील यशोधानगर परिसरात एका ३० वर्षीय तरुणाने त्याच्या सख्ख्या मामीचा विनयभंग केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने पिडीतेसोबत अश्लील कृत्य केले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेननंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिला यशोधरा नगर भागात आपल्या पती व कुटुंबासह राहते. आरोपी हा तिचा नात्याने भाचा असून काही दिवसांपासून तो त्यांच्या घरी ये-जा करत होता. पहिल्यांदा १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास महिला आपल्या बेडरूममधील…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत सुनावणीस नकार दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या समोर आज ही सुनावणी पार पडली. याआधी 19 फेब्रुवारीला प्राथमिक सुनावणी झाली होती, मात्र आजच्या निर्णयामुळे कराडला तातडीचा दिलासा मिळालेला नाही. जर खटल्याची सुनावणी वेगाने पार पडली नाही, तर वर्षभरानंतरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जामिन अर्ज करण्याची संधी मिळेल. याआधी औरंगाबाद खंडपीठ आणि बीड जिल्हा न्यायालयानेही वाल्मिक कराडच्या जामीन अर्जांना नकार दिला होता. आजच्या सुनावणीपूर्वी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून आपली बाजू न्यायालयासमोर…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील पिंपळे रस्त्यावर भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडली असून, व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत साडेपाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना बुधवार (दि. २५) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे आपल्या स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनकडे जात होते. त्यावेळी तोंडाला मास्क लावलेले तीन संशयित मोटरसायकलस्वार त्यांच्या जवळ आले. संशयितांनी प्रथम कोठारी यांचा चष्मा काढून फेकला आणि तत्काळ त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कोठारी गोंधळून गेले. याच वेळी त्यांच्या जवळील साडेपाच लाख रुपयांची रोकड…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीपेठ परिसरात भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडली असून, बँकेतून काढलेले तब्बल १० लाख रुपयांपैकी ८ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (२५ रोजी) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानकासमोरील गल्लीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरांना वेतन देण्यासाठी मक्तेदार मयुर रवींद्र चौधरी यांनी त्यांचे सुपरवायझर प्रेम महारू जाधव यांना बँकेतून १० लाख रुपये काढण्यास सांगितले होते. जाधव यांनी रक्कम काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि निघाले. मात्र काही अंतरावरच दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांनी जवळील पंक्चर दुकानासमोर गाडी लावली. पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना जाधव समोरील नाश्त्याच्या दुकानात गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील सालबर्डी येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी सकाळी घडली. सालबर्डी येथील सर्वेश प्रकाश (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते सालबर्डी शिवारातील योगेश लक्ष्मण झोपे यांच्या शेतात शेतीकामासाठी गेले असताना अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने सर्वेश यांचा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेनंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरखालून त्यांना बाहेर काढण्यात आले तत्काळ त्यांना मुक्ताईनगर जिल्हा उप रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप वानखेडे पुढील तपास…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरण आनंददायी राहील. लहान मुलांना मोठे आश्चर्य मिळू शकते. ऑफीसच्या कामात काही लोकं मदत करू शकतात. तुमच्या आर्थिक समस्या सुटतील. आज तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार कराल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडे काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ राशी आजचा दिवस प्रवासात जाऊ शकतो. ही सहल कामाच्या ठिकाणी काही कामाशी संबंधित असू शकते. तुम्ही थोड्या मौजमजेच्या मूडमध्ये असाल आणि तुमचे मन आनंदी असेल. तुम्ही एखाद्या पारंपारिक गोष्टीकडे आकर्षित होऊ शकता. आज तुम्ही तुमच्या बालपणीच्या मित्राला भेटाल आणि काही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. तुमच्या दैनंदिन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी मतदान 16 मार्च रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे सहा दिवस उरल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी उमेदवार ठरवण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सुमारे 12 प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी चर्चा जोरात होती. तसेच विजया रहाटकर यांचे नावही जवळपास निश्चित समजले जात होते. मात्र वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांची नावे देखील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सरकारने विलंब केल्याने नाराजी व्यक्त करत, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जून महिन्यात पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले किंवा आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, तर कोणत्याही विनंतीकडे सरकारकडून लक्ष दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी संबंधित मंत्र्यांकडे परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. हैदराबाद गॅझेटीयरच्या आधारे राज्य सरकारने अखेर नवीन समिती स्थापन केली असून, ही समिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली काम करणार आहे. समिती मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक निकष, कागदपत्रे, पडताळणी प्रक्रिया यांची आखणी करेल आणि अहवाल राज्य सरकारकडे…

Read More

रावेर : प्रतिनिधी बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर आणि रावेर भागात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री सुमारे ९ वाजता खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ इसमांनी त्यांच्या दुचाकीला अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली. या प्रकरणी…

Read More

मालेगाव : वृत्तसंस्था  मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात नागरिकांनी सामूहिक नमाज अदा केल्याची घटना समोर आली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शहरात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत महापालिकेकडे निवेदन दिले होते. मात्र, समस्येची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्या प्रभागातील नागरिकांनी थेट महापालिकेच्या विद्युत विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी दुपारी तीन वाजता बैठकीसाठी बोलावले होते. वीज समस्येवर चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा आरोप आंदोलकांनी…

Read More