Author: editor desk

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातून समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शाळेतील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. एका लहानशा गावातील विद्यार्थिनीने थेट सत्तेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत आपली व्यथा पोहोचवल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अंकिताने आपल्या पत्रात शाळेची दयनीय अवस्था स्पष्ट शब्दांत मांडली आहे. शाळेत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे, स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब असून अनेक वेळा ती वापरण्यायोग्य नसल्याचे तिने नमूद केले आहे. वर्गखोल्यांची अवस्था बिकट असून छत गळते,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात होणारी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज, 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र, ही सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील हा वाद राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा मानला जात असून, त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीसाठी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या दैनिक कार्यसूचीत क्रमांक 37 वर होती. त्यामुळे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले आणि मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कार्यभार सांभाळलेले भाजप नेते नितीन नबीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काल अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच नितीन नबीन यांनी पक्ष संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचे निर्णय घेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात मनपा निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाचा वाद सुरु असताना आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचालींनी शहरातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी तीव्र रस्सीखेच सुरू असून, त्यातूनच नाट्यमय फोडाफोडीचे राजकारण समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसेचे निवडून आलेले नगरसेवक आपल्या गोटात ओढण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण सध्या प्रचंड अस्थिर आणि उत्कंठावर्धक बनले आहे. निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, मंगळवारी कोकण भवनात गटनोंदणीसाठी झालेल्या प्रक्रियेत ठाकरे गटाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील घरी कोणी नसताना हर्षल उत्तम माळी (वय २२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. २० जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा हर्षल माळी हा तरुण इलेक्ट्रिशीयन होता. त्याचे वडील भाजीपाला विक्रीसाठी बाहेर गेले होते. त्या वेळी घरी एकटाच असलेल्या हर्षलने गळफास घेतला. वडील घरी आले त्या वेळी त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसले. त्या वेळी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने एक संशयित शोरुमध्ये आला. त्याला सेल्समनने दाखविलेल्या पाच चैनपैकी २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची सोन्याची चैन हातचालाखी करीत चोरुन संशयित पसार झाला. चोरी करतांना संशयिताने चैनला असलेले प्लास्टीक रॅपर हे जागेवरच फेकून दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी सुभाष चौकातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अॅण्ड सन्स) या शोरूममध्ये घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुभाष चौकात रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स ही सुवर्ण पेढी असून त्याठिकाणी गणेश काळे (वय ४९, रा. अयोध्या नगर) हे व्यवस्थापक म्हणून…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील नाहाटा चौफुलीपुढे महामार्गावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेत कंटेनर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. वांजोळा रोडवरून सिंधी कॉलनीकडे महामार्ग ओलांडत असताना दुचाकीवरून जाणारे तिघे अचानक समोरून येणाऱ्या कंटेनरसमोर आले. अवघ्या काही क्षणांत निर्णय घेत चालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून कंटेनर समांतर रस्त्यावरील दुभाजकावर चढवला आणि तिघांचे प्राण वाचवले. मिळालेल्या माहितीनुसार,  छत्तीसगडहून जळगावकडे जाणारा कंटेनर नाहाटा चौफुलीच्या उड्डाणपुलावरून उतरत असताना हा प्रसंग घडला. दुचाकी अचानक समोर आल्याने धडकेत भीषण अपघात होण्याची शक्यता होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर वळवला. काही सेकंद उशीर झाला असता तर अनेकांचा जीव गेला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या धडकेत कंटेनरचे मोठे नुकसान झाले…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२१ जानेवारी २०२६ मेष राशी आज, व्यवसायातील नव्या योजना, कल्पना अंमलात आणल्या जातील, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. जमीन आणि वाहनांशी संबंधित व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी, ध्येये आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याचा दबाव असेल. वृषभ राशी आज, तुमचा स्वाभिमान आणि धैर्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल. हा स्वभाव तुमचा मान देशात आणि परदेशात कायम ठेवेल. अनुभवी आणि जबाबदार लोकांचे मार्गदर्शन तुम्हाला आणखी मजबूत बनवेल. मिथुन राशी आज व्यावसायिक कामे सामान्य राहतील. यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. ऑफीसचं कामकाज सुरळीत पार पडेल. कर्क राशी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, जिथे तुम्ही लोकांशी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधिक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव मा. श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सराईत चोरास अटक केली आहे. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव व वरखेड गावातून दिवसा दोन मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ०७/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण दातरे यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून “बाबा सिद्दिकीसारखीच नवनीत राणा यांची हत्या करू” अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे अमरावतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही नवनीत राणा यांना पत्राद्वारे तसेच फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथे दिलेल्या भाषणानंतर आणि ‘हिंदू शेरणी’ या उल्लेखानंतरही…

Read More