Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून लाचखोरीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक हात धुवून मागे लागल्याने आदिवासी विकास भवनातील एका अधिकाऱ्याने चक्क टॉयलेटमध्ये लाच स्वीकारली. गमंत म्हणजे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून तरीही या अधिकाऱ्याला पकडले आहे. काही दिवसांपूर्वीच आदिवासी विकास विभागाचे मुख्यालयात एका एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुलला 28 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे. प्रताप वडजे असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. वडजे हा आदिवासी विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत आहे. रोजंदारीवरील पद स्वयंपाकी किंवा कामाठी करण्याच्या मोबदल्यात या वडजेने लाच मागितली होती.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याचे शिंदे गटातील नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील हे एका वक्तव्यामुळे चांगलेच वादात सापडलेले आहे. तर जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसेना व युवसेनेच्या माध्यमातून निषेध केला आहे. तर दुसरीकडे मंत्री पाटील म्हणाले की स्त्रीरोग तज्ज्ञासंबंधी केलेल्या आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचं राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं त्याचा चुकीचा अर्थ लावला आणि चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्याचंही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ज्ञासंबंधी वक्तव्य केल्यानंतर त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. स्त्रीरोग तज्ञ हे कधीच हातपाय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगरकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आज पहाटे एका कापडमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक बालक आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी नगरकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यारील रेल्वे उड्डाणपूल जवळ आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ काही महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळून आले. हातापायाला काळा दोरा, शाल, औषधी आणि दूध पिण्याची बाटली असे साहित्य बालकाजवळ पडलेले होते. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. चिमुकल्याचा मृत्यू कसा झाला, त्याला कुणी फेकले, त्याचे पालक कोण?, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

Read More

चोपडा : प्रतिनिधी मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी गावाजवळ रात्री वैजापुरच्या तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण ठार तर ६ जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमी आणि मयत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी ता. वर्ला जि. बडवाणी येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास अपघात झालाय. वैजापूर येथील काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीय. परंतू घटनास्थळावर दोन तरुण जागीच ठार झालेत. तर दोन गंभीर जखमी तरुणांना जळगाव जिल्हा रुगणालयात हलविण्यात…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी रेल्वे गैंगमन, टिसी, तसेच म्हाडा मुंबई, फॉरेस्ट विभागात शिपाई अशा ठिकाणी नौकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणांना तब्बल २८ लाखांत गंडवल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण शरद पाटील (रा. खाजोळा ता. पाचोरा), असे संशयित आरोपीचे नाव आहे. पाचोरा पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. पहिली फिर्याद कैलास अशोक पाटील (वय ४१, धंदा : शेती व पानटपरी रा. तारखेडा ता.पाचोरा) यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, भुषण पाटील याने रेल्वे गैंगमन, टिसी, तसेच म्हाडा मुंबई, फॉरेस्ट विभागात शिपाई म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये देऊन सरकारी नोकरीचे काम करुन देतो. त्यानुसार कैलास पाटील…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार साहेबांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झालेला तुमचा आमदार, जो पवार साहेबाना झाला नाही, स्वतःला बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक म्हणवणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना झाला नाही… तो आता बंडखोर शिंदे गटात सामील झाला आहे, हा आमदार थोड्याच दिवसात भाजपात गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच १६ बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई होऊन राज्यातील असंविधानिक सरकार कोसळेल.पन्नास खोके एकदम ओक्के” यात काय दडलंय हे सारी जनता जाणून आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता गद्दारांना माफी करणारच नाही.” या मतदार संघातही आमदार चंदू पाटीलको करारा जबाब मिलेगा….. असे सांगून ५० खोके घेऊन ते जनतेचं प्रेम…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी गेल्या विधानसभा निवडूणुकीत ज्या 90हजार मतदारांनी विश्वास ठेऊन मतदान केले त्यांचेसह मतदार संघातील जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्या आ.खडसे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील, आज तालुक्यात जे जे विकास कामे दिसत आहेत, ती सर्व विकास कामे नाथाभाऊनीच केलेली आहे. त्या कामात बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय तालुकावासीयांसाठी फार मोठी उपलब्धी आहे.तालुका निर्मिती मुळे बोदवड शहरात तहसील कार्यालय आलं, पंचायत समिती आली, कोर्ट आलं… आणि त्यामुळं नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचू लागल्याने शासकीय कामे सहज होऊ लागली. याशिवाय गावागावाना जोडणारे रस्ते, शाळांखोल्या, समाजमंदिरे, प्रशस्त हॉल आदी अनेक विकास कामे गेल्या ३० वर्षात भाऊंनी उभी केलीत. नाथाभाऊ आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यासह सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देखील आयोजित केले जात आहे. जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून विविध आकाराचे गणराया साकारले. विशेष म्हणजे या मूर्ती तयार करताना त्यात वृक्षबीज टाकण्यात आले असून मूर्तीचे दिव्यांग मुलांना मोफत वितरण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामाध्यमातून असून जिल्हाभर विविध उपक्रम साजरे केले जातात. उडानच्या संस्थापिका हर्षाली चौधरी यांनी कल्याण येथील डॉ.जयश्री कळसकर यांच्या माध्यमातून संस्थेतील कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थी, शिक्षकांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणचे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  राज्यात शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात चांगलेच राजकिय चर्चेला उधान आले होत. मनसेची भाजपशी जवळीक वाढत चालली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, याची तपशील अद्याप समोर येऊ शकली नाही. फडणवीस उपमुख्यमंत्री…

Read More

जळगाव(प्रतिनिधी) : २८ ऑगस्ट रोजी रिद्धी जानवी फाउंडेशन व आर जे न्यूज चैनलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डायनामिक पद्धतीने मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला उपस्थित महापौर सौ जयश्रीताई महाजन यांनी आपल्या भाषणात त्यांच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले व प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा असे उपस्थितांना आवाहनही केले.आमदार राजू मामा भोळे यांनी त्यांच्या या कार्याला समाजात एक नवी संकल्पना म्हणून प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.जयेश वाल्हे हे होते.त्यांनी या मोफत नेत्र तपासणीत सुमारे 200 रुग्णाची तपासणी केली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रिद्धी जानवी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपणी यांच्या वाढदिवसानिमित्त हा…

Read More