औरंगाबाद : वृत्तसंस्था राज्यात आज बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना बैलपोळ्याच्या सणाच्या उत्साहावर विरजण टाकणारी घटना फुलंब्री तालुक्यात घडली आहे. सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या काका आणि पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात काका पंढरीनाथ कचरू काळे (वय – ३३) आणि रितेश अजिनाथ काळे (वय-१८) अशी मृताची नावे आहेत. हे दोघेही पोळ्याच्या सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाझर तलावाच्या काठावर घेऊन गेले होते. मात्र, बैलाने धक्का दिल्याने काका पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला पुतण्या देखील पाण्यात बुडाला. फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे ही दुर्दैवी घटना घडली. पोळ्याच्या पूर्वसंध्येला एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप सोबत युती करून आपली सत्ता स्थापन केली होती तर शिवसेनेकडे मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याशिवाय फायरब्रंड नेता म्हणून कुणीही शिल्लक नसल्याने संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आल्याची काम करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना असेल की संभाजी ब्रिगेड सोबत घरोबा करून पुढील रणनीती ठरवतील याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रादेशिक संपूण टाकण्याचं कट कारस्थान सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी…
जळगाव : प्रतिनिधी एकलव्य संघटनेच्या वतीने तसेच एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या आदेशानुसार आज जळगांव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जळगाव तहसीलदार, जळगांव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना जळगाव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष राहूल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जळगांव जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाज मोठ्या संख्येने स्वतंत्रपूर्वी काळापासून वास्तव्य करत असून आजही हा समाजात घरकुल, रेशनकार्ड, पासून वंचित आहे केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर गोरगरीब कुटूंबांना घर देण्याचे ठरवले असून आजही मोठ्या संख्येने आदिवासी भिल्ल समाज हा ह्या योजना पासून दूर आहे तसेच प्रत्येक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आझाद यांनी राजीनामा दिल्याबरोबर पक्षाचे सदस्यत्वही सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद अस्वस्थ होते. ही अस्वस्थता पक्षाच्या बैठकीतून, त्यांच्या विधानांवरुन आणि कृतीतूनही दिसून येत होती. ते कधीही मोठा निर्णय़ घेतील, अशी चर्चा सुरू होतीच. या आधीच १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या प्रचार प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. नियुक्तीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी उघडकीस आली होती. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या खूनप्रकरणात यावल पोलिसांनी अटक केलेल्या चौथ्या संशयितास गुरुवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याच्यासह आधी अटकेत असलेल्या महिलेसह तिघांना २९ ऑगस्ट रोजी न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. उसनवारीचे ४ लाख रूपये मागितल्याच्या कारणावरून चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे (वय ३८) या तरुणाची २१ ऑगस्टच्या रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यात पसार असलेला जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक (रा.अट्रावल) याला यावल पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यास गुरुवारी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एम.एस.बनचरे यांच्यासमोर हजर केले. तेथे त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यात कल्पना शशिकांत पाटील (रा.चितोडा),…
चाळीसगाव : प्रतिनिधी माहेरून ५० हजार रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात धनश्री दीपक शिंदे (रा. आमोदा ता.यावल, ह.मु. ओझर ता.चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ एप्रिल २०१९ पासून ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत पती दीपक देविदास शिंदे याने माहेरून ५० हजार रुपये आणावे म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली. तर सासरे देविदास जालम शिंदे आणि सासू शोभाबाई देविदास शिंदे (सर्व रा.आमोदे ता.यावल) यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन फिर्यदिचा गांजपाठ केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. किशोर पाटील हे करीत आहेत.
यावल : प्रतिनिधी वीज बिल थकीत झाल्यानंतर कनेक्शन कट केल्याच्या रागातून महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप संजय चौधरी (वय २६, रा. मोरेवाडा डांगपुरा यावल) असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या संदर्भात महेद्र सीताराम कुरकुरे (वय ३०, धंदा : महावितरण कार्यालय यावल रा.न्हावी ता.यावल) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, विजबिल बाकी असल्याने प्रदीप चौधरी हे राहत असलेल्या भाड्याच्या घराचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. याचाच राग येऊन दि.२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रदिप चौधरी याने महावितरण कार्यालयात येऊन वरीष्टांनी दिलेल्या विजबीलाची वसुली करण्याचे तसेच थकीत विज…
जळगाव : प्रतिनिधी जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॅलेंज कॅरम स्पर्धा-2022’ या स्पर्धेला सुरूवात झाली. कांताई सभागृह येथे कॕरम स्पर्धेचे कॕरम खेळून उद्घाटन झाले. उद्घाटनाप्रसंगी जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे विजय मोहरील, अनिल जोशी, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयेशा खान, माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे यांच्यासह सर्व सहभागी शाळांचे क्रीडाशिक्षकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पंधरा शालेय संघातील एकूण 75 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात मुलींमध्ये विद्या इंग्लिश स्कूलचे, मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूलचे वर्चस्व राहिले. आज दि. 26 होणाऱ्या मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामान्यात दुर्गेश्वरी धोंगडे विरूध्द…
एरंडोल : प्रतिनिधी धुतलेले कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर टाकणाऱ्या महिलेला वीज वितरण कंपनीच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २५ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भवानीनगर परिसरात घडली. सविस्तर वृत्त असे की, शहरातील भवानी नगरमध्ये रामदास काशिनाथ भोई, मीराबाई रामदास भोई, सुरेश रामदास भोई हे मुलांसह राहतात. सकाळी पती रामदास भोई, मुलगा सुरेश भोई व सून हे सर्व कामावर निघून गेले. तर मीराबाई या देखील बोंबील, झिंगे विक्रीचे काम करतात. घरातील सर्वजण कामावर निघून गेल्यामुळे आंघोळ करून मीराबाई या धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेल्या. त्यांच्या गच्चीवरून वीज वितरण कंपनीचे तार गेलेले आहेत. या तारांना स्पर्श झाल्याने मीराबाई भोई…
जळगाव : प्रतिनिधी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी आणि एन.एस.एस. युनिट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर टी ओ कार्यालय आणि जळगाव वाहतूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जागृती अभियानासंदर्भात कार्यक्रम सफल झाला. या वेळी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ए.ए. शेख, डेप्युटी आर.टी.ओ. श्याम लोही आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक लीलाधर कानडे यांची व्याख्याने झालीत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसोर एस.एन. भारंबे हे अध्यक्ष स्थानी होते. श्याम लोही यांनी रस्ता अपघाताची करणे आणि उपाय स्पष्ट केलीत तर न्यायाधीश श्री शेख यांनी कायद्याच्या वाहतूक, रस्ता सुरक्षे बाबत सखोल बाबी छात्र सैनिकांना सांगितल्यात. तसेच त्यानी स्वयंसेवक आणि छात्र सैनिक यांच्या…

