देशाच्या परकीय चलन बाजाराच्या आकडेवारीनुसार बाजार उघडताच रुपयाने घसरण दाखवण्यास सुरुवात केली. डॉलरच्या तुलनेत रुपया खालच्या स्तरावर घसरला आहे. ऐतिहासिक घसरणीसह रुपया 80 रुपये पार करून 80.11 पैशांवर घसरला आहे शुक्रवारी डॉलरचा भाव 79.87 पैसे होता. आज बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 80.11 रुपयांवर पोहचला आहे. शुक्रवारच्या तुलनेत 21 पैशांची घसरण नोंदवली गेली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत कमालीची घरसण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सर्वात नीचांकी स्तरावर गेला आहे. रुपयाच्या सततच्या घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलरचे वर्चस्व आणि भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे रुपयावर दबाव वाढत आहे. 2022 मध्येच डॉलरच्या तुलनेत रुपया 7…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव येथील तब्बल ७ कोटी ३५ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद असणार्या पाणी पुरवठा योजनेचे आज ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपुजन करण्यात आले. जलजीवन मिशनच्या अंतर्गत या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून या माध्यमातून साकेगावला ही योजना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच याप्रसंगी दोन्ही मंत्र्यांनी साकेगावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी साकेगाव येथे जलजीवन मिशनच्या अंतर्गत ७ कोटी ३५ लक्ष रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात…
नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यावर केंद्रीय मंत्री गडकरींनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य पक्षात जाणार नाहीत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत बोलत असतांना त्यांनी विहिरीत उडी मारीन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे म्हटले आहे. गडकरींनी सांगितलं की, जेव्हा ते विद्यार्थी नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी गडकरींना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. त्याबद्दल सांगताना गडकरी म्हणाले की, मी श्रीकांतला सांगितलं की मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही. नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगून सध्याच्या…
भुसावळ : प्रतिनिधी बायोकेमिकल ऑईलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन जणांच्या बँक खात्यावर तब्बल १६ लाख रूपये टाकूनही ऑइल दिले नाही आणि पैसे परत देण्यासही टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झालेल्या व्यक्तीने सूरत येथील दोन जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. येथील हॉटेल व्यावसायिक सारंगधर महादेव पाटील उर्फ छाेटू ढाबेवाले यांना बायाेकेमिकल ऑईलचा व्यवसाय सुरू करायचा हाेता. यासाठी त्यांनी सूरत येथून अालेल्या कंपनीच्या हिरेन ताेमर व राकेश (पूर्ण नाव माहिती नाही) दाेन एजंटसोबत चर्चा केली. दाेघांना २० लाख रुपयांच्या ऑइलची अाॅर्डर दिली. त्यापैकी १६ लाख रूपये ३ डिसेंबर २०२१ रोजी दोघांच्या बँक खात्यावर टाकले. यानंतर पाटील यांनी हिरेन…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा बाथरूममध्ये विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इब्राहीम भोजू गवळी (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, दि.२४ ऑगस्ट रोजी पहाटे पिडीत महिला आपल्या बाथरुममध्ये गेली होती. याचवेळी इब्राहीम गवळी याने पिडीत महिलेला मागून पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न असे कृत्य केले. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपी इब्राहीम हा पिडीतेचा मागील तीन महिन्यापासून शौचास व भाजीपाला घेणेस जात असतांना पाठलाग करीत होता. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून इब्राहीमविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.काँ. गणेश रोठोड हे करीत आहेत.
फैजपूर : प्रतिनिधी लोण (कर्ज) मंजुर करुन देण्याच्या नावाखाली फैजपूरच्या तरुणाला एक लाखात गंडवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष युवराज तळेले (वय २३, धंदा – खासगी नोकरी) हा बामणोद येथे वास्तव्यास आहे. आशिषच्या मोबाईलवर मोबाईल क्रं ९९१११०३९०५ व ९६६७८५२९५० धारक यांनी फोन करून तुम्हाला भारती अँक्सा लाईफ ईन्सुरन्स कंपनीची पॉलीसीवर सहा लाख कर्ज मिळवून देतो अशी थाप मारली. त्यासाठी तुम्हाला pre payment charges साठी १७ हजार ५१२ रुपये तसेच क्रेडीट चार्ज म्हणून २५ हजार ५०० रुपये, फुल अँन्ड फायनल सबमिशन पेमेंट म्हणून ३० हजार रुपये आणि लोण फायनल मंजूर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा २८ हजार ४०० रुपये भरावे…
जळगाव : प्रतिनिधी हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्या (आंबिया बहार) नुकसान भरपाईची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची सूचना विमा कंपनीला द्या, असे आदेश ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले. यामुळे जिल्ह्यातील विमाधारक ५० हजार शेतकऱ्यांना ३७० कोटी रुपये मिळतील. हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ अंतर्गत केळी विमाधारक शेतकऱ्यांना कमी व जास्त तापमान, वादळी वारा व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मंजूर झाली आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या ५० हजारापर्यंत आहे. त्यांना सुमारे ३७० कोटींची नुकसान भरपाई मंजूर आहे. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. याबाबत ग्रामविकास…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव रस्ते साधन सुविधा व आस्थापना यांच्यातर्फे मनसे सभासद नोंदणी घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटन शुभ हसते जळगाव शहर महानगर अध्यक्ष विनोद शिंदे , महानगर उपअध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे रस्ते आस्थापनाचे जळगाव संघटक राजेंद्र निकम, महानगर अध्यक्ष विनोद शंकर शिंदे, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे , प्रशांत शिरसाठ, रोहिदास मिस्तरी, योगेश पाटील, किरण सपकाळे, योगेश पाटील, ललित शर्मा, महेश माळी, विकास पाथरे,गणेश नेरकर, विशाल कुमावत, गोविंद जाधव, संतोष सुरवाडे, मनोज खुडे, किशोर खडसे, भिकन शिंपी, निलेश खैरनार, अविनाश जोशी, सागर पाटील आदी पदाधिकारी तसेच अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.
यावल : प्रतिनिधी शहरातील काजीपुरा वस्तीतील ३८ वर्षीय महिलेच्या खूनप्रकरणी अटकेतील आरोपीला १ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अनैतिक संबंधातून वाढलेल्या वादात सदर महिलेकडून तिघांच्या मदतीने मे महिन्यात या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात तरूण बचावला होता. त्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात तडजोडीसाठी वाढत्या दबावाच्या तणावातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरातील काजीपुरा वस्तीतील नाजिया खलील काजी (वय ३८) या महिलेची संशयित जावेद युनूस पटेल (वय २३) याने डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर तो स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला होता. या संशयिताला रविवारी सकाळी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एम.एस.बनचरे यांच्यासमोर हजर केले. तेथे त्याला १…
जळगाव : प्रतिनिधी कोरोना काळात सुरक्षेचा उपाय म्हणून शालेय क्रीडा स्पर्धांना स्थगिती होती. मी शालेय जीवनापासून स्वतः खेळाडू असून खेळाडूहीत लक्षात घेता शालेय क्रीडा स्पर्धा या झाल्याच पाहिजेत. त्यामुळे तात्काळ शालेय क्रीडा स्पर्धा या सुरुच करणार व या बाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे मत क्रीडामंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे शिष्टमंडळाने क्रीडामंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांची जामनेर येथे भेट घेतली व निवेदन दिले त्या वेळी ते बोलत होते. जामनेर येथे भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या उपक्रमांतर्गत मंत्री महोदयांसोबत शिष्टमंडळ व कार्यकत्यांनी मन…

