जळगाव : प्रतिनिधी एका तरुणीनेचे बनावट अश्लिल फोटो बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 15 ते 21 ऑक्टोंबर दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या व्हॉटसअप मोबाईल क्रमांक +8801408-372865. +8801614-690909 वरुन तरुणीचा चेहरा असलेले फोटोला अश्लील फोटो सोबत एडीट केला. त्यानंतर ते बनावट अश्लिल फोटो पिडीत तरुणीच्या दोन मैत्रीणींना पाठवले. तसेच ते फोटो अधिक व्हायरल न करण्यासाठी पैशांची मागणी केली. शेवटी तरुणीने जळगाव सायबर पोलिसात दिली . यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील एका २८ वर्षीय तरुणास मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौघांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील जुना कानळदा रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी नगरातील गल्ली न २ मध्ये दि १९ रोजी संध्याकाळी जब्बार खान गफ्फार खान(वय २८) हा तरुण हातमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. त्यास १९ रोजी चौघांनी उसनवारीचे पैसे न दिल्याच्या रागात हातातील फरशीने ओठाला व मानेला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना स्वप्नाली सोनवणे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी प्रवीण पाटील तालुक्यातील वावडदा ग्रुप ग्रामपंचायत मार्फत गावातील नागरिकांना अनोखी दिवाळी भेट देण्यात आली. यंदाच्या दिवाळीत ग्रामपंचायतचे सर्व कर भरणाऱ्या नागरिकांना चक्क फराळाचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजेश वाडेकर यांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त जे नागरिक घरपट्टी व पाणीपट्टीचा कर भरतील त्यांच्यासाठी ग्रामपंचायत कडून दोन किलो तेल, दोन किलो साखर, एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो बेसनपीठ इत्यादी असा रुपये पाचशे चा किराणा मोफत देण्यात येत आहे. या आगळ्या वेगळ्या योजनेचा फायदा असंख्य नागरिक उस्फूर्तपणे त्यांच्याकडील बाकी रक्कम भरुन करीत आहेत. या सुवर्ण संधीचा लाभ दिवाळीच्या दिवसापर्यंतच आहे. योजनेचा लाभ घेतानाचे सन्माननीय नागरिक…
पालघर : वृत्तसंस्था पालघर शहरात विष्णूनगर परिसरामधील वर्धमानसृष्टी या गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास या चिमुकलीच्या नातेवाईकाने तिचे अपहरण केले पोलिसांनी अवघ्या दोन तासात चिमुकलीसह अपहरणकर्त्याला शोधून त्याला ताब्यात घेतले. सनी कांबळे या तरुणाने या मुलीच्या घरातून तिला फिरवण्याच्या व खाऊ देण्याच्या बहाण्याने नेले. मात्र आपली मुलगी घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर अचानक अपहरण करता सनी कांबळे यांनी या चिमुकलीच्या वडिलांना फोन करून त्यांच्याकडून एक लाखापेक्षा जास्त खंडणी मागितली. असे करताना तो आपली ठिकाण चीमुकलीसह वारंवार बदलत होता. मुलीचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर मुलीच्या आईने व…
मुंबई : वृत्तसंस्था शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाने पुरता खचलेला असताना त्याला मदत देण्याबाबत फारसे इच्छुक दिसत नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतीपिके वाया गेली आहेत हे सरकारला दिसत नाही का? दिवाळीच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती, परंतु शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय अपेक्षित होते. अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना राज्य सरकार तत्काळ मदत देऊन दिवाळी गोड करेल, अशी अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार हे शेतकरी हिताच्या केवळ पोकळ गप्पा मारत…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गरताड येथील रात्रीच्या सुमारास घरात घुसून घरफोडी करत २ लाख ८५ हजाराचा सोने चांदीसह रोकड लाबविल्याची घटना उघकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गरताड येथील केशरलाल मोतीलाल पाटील(वय ४६) हे शेतीसह खाजगी नोकरी करून आपल्या उदरनिर्वाह करीत आहेत. दि १९ रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्ती यांच्या मालकीच्या घरातील मागील बाजूचा दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातील सोने व चांदीचे दागिने यासोबत रोकड रक्कम तब्बल २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे लंपास केली आहे. या प्रकरणी केशरलाल मोतीलाल पाटील यांनी दि २० रोजी चोपडा शहर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारच्या ३८ मंत्रालयांत आणि विभागांत नियुक्त केले जाईल. या नियुक्त्या केंद्र सरकारच्या गट-अ, गट-ब राजपत्रित आणि गट-क च्या पदांवर होतील. केंद्रीय सशस्त्र दल कर्मचारी, उपनिरीक्षक, काॅन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, प्राप्तिकर निरीक्षक आणि एमटीएसच्या नियुक्त्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी १० लाख पदांवर भरती करण्याची मोहीम सुरू करतील. त्याला ‘रोजगार मेळा’ असे नाव देण्यात आले आहे. त्यात ७५,००० तरुणांना नियुक्तिपत्र दिले जाईल. पंतप्रधानांनी या वर्षी जूनमध्ये सरकारच्या विविध मंत्रालयांना आणि विभागांना मिशन मोडद्वारे १० लाख पदांवर भरती करण्याचे निर्देश दिले होते. पंतप्रधान आज केदारनाथ दौऱ्यावर पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी केदारनाथला जातील. ते…
मुंबई : वृत्तसंस्था बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार आहे. मुलूंड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. आता पोलिस काय कारवाई करणार, याची उत्सुकता आहे. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या महिन्यापासून यावर सुनावणी सुरूय. राणा यांनी याप्रकरणी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथेही या कारवाईला स्थगिती मिळाली नाही. या प्रकरणी 7 नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होण्याची शक्यताय. तोपर्यंत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस आहे,…
मुंबई : वृत्तसंस्था यवतमाळ जिल्ह्यात भाजपला ठाकरे गटाने मोठा धक्का देत राज्याचे माजी राज्यमंत्री तथा दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते शिवबंधन देशमुख यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. विद्यमान मंत्री संजय राठोड आणि भाजपला हा धक्का मानला जात असून दिग्रसमधून संजय राठोडांना ते मोठे आव्हानही देऊ शकतात. देशमुख यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. याच वेळी ठाण्यातील संजय घाडीगावकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला.गेल्या अनेक दिवसांपासून संजय देशमुख शिवसेनेत (ठाकरे गट)प्रवेश करणार…
जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एलसीबीचे तत्कालीन निलंबित निरीक्षक किरणकुमार बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानंतर हायकोर्टानेही फेटाळला आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर आज औरंगाबाद न्यायालयाने बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याआधी जळगाव जिल्हा न्यायालयानेही बकालेचा अर्ज फेटाळून लावला होता. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर…

