Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुण-तरुणीसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं 50 टक्के पद भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त…

Read More

यंदा खरिपाच्या हंगामात बेभरवशाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ विभागात सोयाबीनच्या पिकास सर्वात जास्त फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कापूस,भाजीपाला व फळबागाना याची झळ बसली आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा होती,परंतु सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे आणि विमा संदर्भातील दिरंगाईमुळे नाईलाजाने शेतकऱ्यांनी दिवाळी कशीबशी काढली, खोक्यांमध्ये अडकलेली सरकारे शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहेत हेच या काळात अधोरेखित झाले आहे. पूर्वी सरकारी अधिकारी पंचनामा करीत परंतु आता मोबाईल वरती वरती फोटो काढून पाठवा असे विमा कंपनी कळवते. शेतकऱ्यांना यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येतात. सध्या विमा अधिकारी पाहणी करीत आहेत परंतु पीक काढून झालेल्या सोयाबीनच्या वावराची पाहणी करून निष्कर्ष कसा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील एका परीसातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने दि २५ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तिच्या घरातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.हरीश भोये हे करीत आहेत.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच असता शिंदे सरकार व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये दिवाळीनिमित्त दोन्हीकडून फटाकेबाजी सुरु आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी मोठं विधान केलं आहे. दोन महिन्याभरात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली यांनी केलं आहे. रूपाली पाटील या बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, ‘शंभुराज देसाई म्हणतात पुढचे 25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. पण त्यांनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये, मुळात आत्ताच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील महाबळ परिसरातील हेमंत क्लासेसने दरवर्षाप्रमाणे यंदाही विद्यार्थिनसाठी ‘ज्ञानोस्तव’ भरविला आहे. https://youtu.be/RXwZQ_CmrUQ या ‘ज्ञानोस्तव’ विद्यार्थिनीना नेहमी अभ्यास आणि अभ्यास इतकेच न राहता त्या पलीकडे या क्लासेसमध्ये या दिवाळीच्या दिवसात ५ दिवसाच्या ‘ज्ञानोस्तव’ उच्च शिक्षित शिक्षकाकडून मार्गदर्शन यासह विद्यार्थिनीना येणाऱ्या समस्या अभ्यासक्रम किवा दहावीचा अभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शनासह विविध विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थिच्या मनातून १० वी परीक्षेची भीती बाहेर काढण्यासाठी हा ज्ञानोस्तव’ साजरा केला जातो. यावेळी हेमंत क्लासेसचे संचालक व शिक्षक वृद परिश्रम घेत आहे.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उखळवाडी येथे दि २६ रोजी गरजू व आदिवासी बंधूसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. तालुक्यातील उखळवाडी येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी व गरजूसोबत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व विकास सोसा उखळवाडीचे चेअरमन पंढरीनाथ जी पाटील यांच्यासह नागरिकांनी एकत्र येत दिवाळी सन साजरा करून सामाजिक भान जोपासले आहे. त्याच्या या कार्याचे तालुकावासियानी कौतुक केले आहे.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  कृषी संस्कृती व श्रम संस्कृतीचा जागर करण्यासाठी व बळीराजाचे स्मरण करण्यासाठी “बळीराजा गौरव दिवस” भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शेतकरी बंधूंच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ शेतकरी यांच्या हस्ते करण्यात आले.पूजनानंतर परीसरातील शेतकरी बांधवांचा रुमाल,टोपी,नारळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी चंदन पाटील यांनी बळीराजा विषयी भावना व्यक्त केल्या त्यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,शिरिषआप्पा बयास,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,अँड वसंतराव भोलाने,पुनीलाल अप्पा महाजन,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर,नगरसेवक पप्पु भावे,भानुदास विसावे,शरद अण्णा धनगर,ललित येवले,विजय महाजन,विलास महाजन,गुलाब मराठे,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शिवसेनेचे संजय चौधरी,भैय्या महाजन,बुटा पाटील,वाल्मिक पाटील,पवन महाजन,भाजपचे भास्कर…

Read More

सलमान खान राहत असलेल्या अपार्टमेंटची मुंबई महापालिकेकडून पाहणी करण्यात आली. लेक्सी अपार्टमेंटच्या अडगळीच्या ठिकाणी डेंग्युच्या अळ्या सापडल्या आहेत. तरी पालिकेकडून या जागांसह संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटचं निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. बिग बॉस १६ च्या या आठवड्याच्या वीकेंड धमाक्यात होस्ट सलमान खान दिसणार नसल्याचे समजतेय. ऐन दिवाळीच्या तोंडावर सलमानला डेंग्यूची लागण झाली असून तो अजूनही रिकव्हर होत आहे. सलमान खानच्या घरात डेंग्युच्या अळ्या सापडल्या नसल्या तरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्याने सलमानला डेंग्युची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधीत माहिती फ्रीप्रेस जर्नलच्या वृत्ताकडून प्रसारित करण्यात आली आहे. बीएमसी कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी खुद्द अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव यांच्यातर्फे, दिवाळीनिमित्त धरणगाव शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांत, एक हजार गोरगरिब कुटुंबांना व अनाथांना दिवाळीचा फराळ वाटण्यात आला. तसेच बोरगाव मतिमंद मुलांच्या वस्तीगृहात ९० हून अधिक अनाथ मुलांना फराळ वाटण्यात आला. तसेच वनकुटे येथील सहवास मतिमंद प्रौढ निवासी शाळेला ७० हून अधिक दिवाळी फराळाची पाकिटे देण्यात आली. संस्थेने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव केंद्राला आभार पत्र दिले. धरणगाव शहरातील जिनिंग व्यवसायात काम करणारे कामगारांना फराळाचे या कालावधीत नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाने वाटप करण्यात आले. या उपक्रमाला तालुका वेले (ता. चोपड़ा) येथे…

Read More

यंदाची दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे, तर भाऊबीज सणाला हि लहान बहिण मोठ्या भावाला हक्काने भेट वस्तू मागत आहे तुम्हाला नक्की विचार पडला असेल कि आज बहिणीला काय भेट देणार आम्ही तुम्हाला काही सुचवू शकतो ज्याने बहिण अगदी खुश होवून जाईल. सौंदर्य प्रसाधने – सौंदर्य प्रसाधने महिलांना अत्यंत प्रिय असतात. त्वचेला उजळ करण्यासाठी किंवा अन्य उत्सव किंवा कार्यक्रमाप्रसंगी महिला आवर्जून मेकअप करतात. तुम्ही त्यांना मेकअप किट गिफ्ट करून आणखी त्यांच्या सौंदर्यप्रसाधनांत आणि आनंदातही भर पाडाल. हॅंडबॅग- तुमची बहिण जॉब करत असेल किंवा शिकत असेल तर तिच्यासाठी ही भेटवस्तू उत्तम ठरेल. या हँडबॅगमध्ये ती तिच्या उपयोगात येणाऱ्या लहानसहान वस्तू ठेवू…

Read More