हिंगोली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून काँग्रेसने पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत, “अमेरिकेशी व्यापार करार करून केंद्र सरकार अक्षरशः शरण गेले आहे. त्यांनी अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर न होता ठामपणे भारताची भूमिका मांडावी,” असे स्पष्टपणे म्हटले. सपकाळ यांच्या नेतृत्वात आज हिंगोली येथे भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात ‘शेतकरी संघर्ष पदयात्रा’ काढण्यात येत आहे. या पदयात्रेत हिंगोलीसह आसपासच्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. पदयात्रेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने अमेरिकेशी व्यापार करार केल्यानंतर…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी तू इकडे का आला आहेस असे बोलण्याच्या राग आल्याने विक्की ज्ञानेश्वर माळी (वय २१, रा. जानकीनगर) या तरुणासह त्याच्या मामीवर धारदार कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास जानकी नगरात घडली. याप्रकरणी संशयित मिलींद अरविंद चौधरी (रा. ज्ञानदेवनगर,) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जानकी नगरात विक्की माळी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास विक्की हा घराजवळ उभा होता, त्यावेळी आनंद चौधरी हा त्यांच्याजवळ आला. विक्की याने त्याला तु कशासाठी आला आहे असे विचारले, त्यावेळी आनंद याने त्याचा मित्र तेजस पवार याला…
जळगाव : प्रतिनिधी पैसे कर्जाने काढून हॉटेल उभे केले, पण मध्येच ते बंद करण्यास सांगत असल्यामुळे मानसिक व आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीक प्रमोद पुरुषोत्तम पाटील (वय ५६) यांनी हॉटेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये त्यांनी परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद पाटील यांनी परेश पाटील यांच्यासोबत भागीदारीतून हॉटेल आस्वाद सुरू केले होते. मात्र काही कारणांमुळे हे हॉटेल मागील काही दिवसांपासून बंद होते. दरम्यान, संबंधित हॉटेल ज्या शेतजमिनीत सुरू होते ती जमीन परेश सुभाष पाटील व सुभाष…
भडगाव : प्रतिनिधी दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या दोघांच्या बलिदानाने रविवारी संपूर्ण भडगाव तालुका सुन्न झाला. गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या लहान मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने पाण्यात उतरलेल्या नदीम खान नसीम खान (वय २७) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय १६) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून, अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यांनी या निष्पाप जीवांचा बळी घेतल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात काही लहान मुले पाण्यात वाहतांना दिसून आली. जवळच काफिया कपडे धुत होती. त्यांना वाचवण्यासाठी काफीयाने नदीत उडी घेतली. तिला पाण्याचा अंदाज न लागल्याने ती…
आजचे राशिभविष्य दि. ९ मार्च २०२६ मेष राशी शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यात व्यस्त असतील. आज तुमचा व्यवसायातील नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या जुन्या प्रकरणामुळे गोंधळून जाल. तुमच्या कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाणे फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला आर्थिक मदत करू शकाल. घरातील बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना आजचा दिवस आरामदायी वाटेल. तुमच्या मोठ्या बहिणीचा सल्ला फायदेशीर ठरेल. रंगपंचमीला तुमचे प्रेम जीवनही सुधारेल. वृषभ राशी आज, तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी दयाळूपणे वागाल आणि तुमचे शब्द काहींना प्रभावित करतील. आर्थिक स्थैर्य राहील. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जेवायला जाऊ शकता. माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना हा दिवस…
जागतिक महिला दिनानिमित्त, मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान जळगाव : प्रतिनिधी आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या चार शब्दांमध्ये स्त्रीचे संपूर्ण विश्व सामावलेले असून या चार नात्यांमुळेच कुटुंब उभे राहते, संस्कार रुजतात आणि समाजाचे भविष्य घडते. महाराष्ट्राची भूमी ही जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी पावन केलेली आहे. या भूमीत स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाही, तर समाज परिवर्तनाची एक मोठी शक्ती आहे. आज प्रशासनातील विविध क्षेत्रांमध्ये महिला आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने स्वतःची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिला अबला नसून सबला आहे. समाजाचे रक्षण…
मुंबई : वृत्तसंस्था इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. राज्यात कुठेही पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, काही माध्यमांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी गर्दी केली आणि मोठ्या रांगा लागल्या. मात्र प्रत्यक्षात राज्यात कुठेही इंधन टंचाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने ऊर्जा सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली…
जळगाव : प्रतिनिधी महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच तक्रार निवारणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्रा’च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज (दि. ८ मार्च) जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात उत्साहात संपन्न झाले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी या केंद्राच्या उभारणीमागील उद्देश स्पष्ट करताना महिला व बालकांना एकाच ठिकाणी कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन आणि पोलिसांचे तातडीचे सहाय्य उपलब्ध करून देण्याची सुविधा या केंद्रातून मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन…
कोल्हापूर : वृत्तसंस्था आपल्या केबिनमध्ये बोलावून एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सौरभ जोशी असे आरोपी प्राध्यापकाचे नाव असून त्याच्याविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही शिक्षणासाठी कोल्हापुरात वास्तव्यास आहे. आरोपी प्राध्यापक सौरभ जोशी याने नोव्हेंबर २०२५ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. जोशी हा विद्यार्थिनीला वारंवार फोन व मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत असे. त्यानंतर केबिनमध्ये तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार विद्यार्थिनीने केली आहे. तक्रारीनुसार,…
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. या प्रकरणी सध्या केवळ प्राथमिक अहवाल समोर आला असून अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण यावर सविस्तर भाष्य करू, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे. अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी विविध सादरीकरणांच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या तपासातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, या…

