Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ व समाज बांधव यांच्या मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाले.              “राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं” हा छत्रपतींचा आदर्श घेऊन रयतेच्या राजाच्या जयंतीनिमित्त कुणबी पाटील समाज मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण करून मंगल कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर समाजाचे जेष्ठ संचालक माधवराव पाटील, चुडामण पाटील, रामचंद्र पाटील, गुलाब पाटील, दत्तू पाटील, भगवान पाटील यांच्या हस्ते फलकाचे अनावरण व माल्यार्पण करण्यात आले. समाजाच्या सर्व सदस्यांनी महाराजांचे पूजन करून पुष्पांजली अर्पण केली.              जवळजवळ मागील ३५…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जोशी पेठ येथून मेडीकल दुकानदाराची घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद इस्त्राईल मोहम्मद मुस्ताक तांबोळी (वय-३३) रा. बागवान मोहल्‍ला, जोशी पेठ हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मेडिकलच्या दुकान चालूवन आपल्या कुटूंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीपी ६३९५) क्रमांकाची मोटरसायकल आहे. १४ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे दिवसभर काम करून सायंकाळी ११.३० वाजता घरी आले व त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरुन नेल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला…

Read More

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील आदीवासी आश्रमशाळेत भारतीय सेनेत १८ वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले जवान ईश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बी.एल. देशमुख हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जवान ईश्वर पाटील यांच्याहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी मनोगतातून जवान ईश्वर पाटील यांनी देशसेवेच्या भावनेतून केलेल्या कार्याचा गौरव केला. शाळेतील विदयार्थ्यांना सैन्य दलात जायचे असल्यास आपण अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल असे सेवानिवृत्त जवान ईश्वर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी भारताची गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौकात रोटरॅक्ट क्लब जळगावच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवकालीन पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्य बॅनर लावण्यात आले होते. याप्रसंगी मावळे, सरदार, पेशवे, भालदार, अशी पोशाख घातलेले सदस्य त्या वेळी उपस्थित होते. शिवतीर्थ मैदानावरून पायी मिरवणूक काढून महाराजांची पितळी मूर्ती हातात घेत पालकमंत्री गुलबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी मंत्री गुलाबराव देवकर,पोलीस उपनिरिक्षक कुमार चिंथा,पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, माजी चेअरमन तथा संचालक भालचंद्र पाटील यांनी उपस्थिती दिली. शिवाजी महाराजांना मानवंदना देत मुजरा करण्यात आला व आरती पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाच्या सौजन्याने 2200 जणांना रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते नागरिकांना रेशन कार्ड देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांच्या प्रयत्नांनी नागरिकांना हे रेशन कार्ड वाटप करण्यात आले. जिल्ह्यात अनेक नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. कधीकधी दलालांकडून त्यांची आर्थिक लूट होते. ही सर्व परिस्थिती पाहता पंकज महाजन यांनी नशिराबादच्या नागरिकांची ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आज नागरिकांना घरबसल्या रेशन कार्ड मिळत…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील वसंतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रविण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची माहिती देवून त्यांच्या कार्याला उजाळा दिली. याप्रसंगी वसंतवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनार, युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील, प्रविण पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण माजी उपसरपंच गजमल पवार, बाबुराव राठोड, समाधान चव्हाण,बाबु चव्हाण व ग्रामसेवक बबन वाघ, पोलिस पाटील संजय चिमणकारे, ग्रामपंचायत शिपाई रामेश्वर चव्हाण इत्यादी उपस्थित होते

Read More

तालुक्याची तंबाखूमुक्त शाळांच्या तालुक्याकडे वाटचाल ! प्रतिनिधी लक्ष्मण पाटील – सलाम मुंबई फाऊंडेशन व प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमांतर्गत धरणगाव तालुक्यातील सोनवद बुद्रुक या केंद्राने १००%तंबाखू मुक्त शाळाचे पहिले केंद्र होण्याचा मान मिळविला आहे. सोनवद बु॥ केंद्रात सर्व माध्यमाच्या १६ शाळा आहेत. त्या १६ शाळांनी तंबाखू मुक्त शाळांचे ९ योग्य निकष यशस्वीपणे अपलोड करून आपल्या शाळा तंबाखू मुक्त केल्या. याकामी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सोनवद केंद्राची धुरा समर्थपणे सांभाळणारे प्रभारी केंद्रप्रमुख दिलीप बाविस्कर सर व तालुकासमन्वयक संजय गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. त्याबद्दल त्यांच शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव…

Read More

वृध्द महिलेला शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला शिकविला धडापोलीस निरक्षक शंकर शेळके यांनी तात्काळ मदत केल्याने वृध्द महिलेच्या डोळ्यात पाणी तरळले !गावकऱ्यांसमोर वृध्द महिलेची तरूणाने मागितली माफीउत्कृष्ट कामगिरी केल्याने गावकऱ्यांमध्ये खाकीची ‘कॉलर झाली टाईट’एकटे वृध्द व्यक्तींना त्रास दिल्यास गय केली जाणार नाही- पो.नि. शंकर शेळके प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : पोलीस म्हटलं म्हणजे बंदूक, काठी आणि मारहाण हे सर्वसामान्य माणसासमोर चित्र उपस्थित होते. परंतू धरणगाव पोलीसांनी खाकी वर्दीतील माणूसकी दाखवून सर्वसामान्य माणसांमध्ये आदराची भावना निर्माण केली आहे. तालुक्यातील साकरे येथील महिलेला शिवीगाळ करून तिचे अंड्याचे नुकसान करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी पकडून महिलेसह तिच्या कुटुंबियांकडे माफी मागविण्यास भाग पाडले. एवढेच…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील जय भोले नावाच्या कंपनीतून चोरी करून रोकड लांबविणाऱ्या चोरट्याला अटक करून १ लाख ३ हजारांची रोकड जप्त केल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांनी कळविले आहे. सविस्तर माहिती अशी की, भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथील व्यापारी अमर दयालदास कटियारा वय ४२ यांची एमआयडीसीतील जी २० सेक्टर येथे जय भोले नावाची कंपनी आहे. कंपनी बंद असतांना बुधवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्यांनी कंपनीचे कुलूप तोडत कंपनीत प्रवेश करीत कंपनीच्या ऑफिसमधील १ लाख ५२ हजारांची रोकड व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यागुन्ह्यातील संशयित आरोपी भिमकुमार प्रभास यादव रा.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने शहरातील मानियार बिरादरीतर्फे गुरूवार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा न्यायालयात जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांचा सत्कार करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील चार वर्षीय बालीके सोबत अत्याचार करणाऱ्या आरोपी सावळाराम भानुदास शिंदे यास जिल्हा न्यायालयाने ६० दिवसात निकाल देत मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानिमित्ताने जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांचा गुरूवार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयात जावून सत्कार करण्यात आला. जळगाव पोलीस दल व सरकारी वकील यांनी शासनातर्फे उच्च न्यायालयात…

Read More