Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विजेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
    क्राईम

    विजेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 21, 2022Updated:March 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । गुरांना चारा कापण्यासाठी गेलेल्या म्हसावद येथील लोटन देवराम महाजन (वय-६०) या वृध्दाचा विजेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २० मार्च रोजी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    लोटन देवराम महाजन (वय-६०) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
    सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रहिवाशी लोटन महाजन हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवार १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते गुरांना चारा कापण्यासाठी म्हसावद शिवारातील शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील चारा कापत असतांना बाजूला पडलेल्या विद्यूत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. त्यातच त्यांचा जगीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. खातीना पठाण यांनी मयत घोषीत केले. रविवारी २० मार्च रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.