पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी केले स्वागत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जळगाव विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी त्यांचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगाव प्रतिनिधी । शहरातील मुन्नादेवी ॲण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनने विद्यार्थिनींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत पालकत्वाची जबाबदारी पार पाडून अनोखा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन विद्यार्थिनींच्या पालकांचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले होते. अशा अवेळी मायेचे छत्र हरवल्यामुळे या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी संस्थेचे अध्यक्ष जीवनसिंह बयस पुढे सरसावले आणि या विद्यार्थिनींच्या पदवीपर्यंत च्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेमार्फत स्वीकारली. यापैकी एक विद्यार्थिनी स्वाती अरुण बिसेन हिचे लग्न ठरले असतांना जिवनसिंह बयस यांनी सदर मुलीला लग्नाप्रीत्यर्थ सोनसाखळी भेट स्वरूपात देऊन लग्नापर्यंतचे पालकत्वाचे उत्तरदायित्व पार पाडले. उपक्रमामुळे सर्वत्र अभिनंदनया स्तुत्य उपक्रमाबद्दल समाजातील…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. मुलीचे वय १६ वर्ष असतांना तिची आई व मामाने जामनेर तालुक्यातील साहिल बाशीर तडवी यांच्याशी व्यक्तीशी ६ जून २०२१ रोजी लग्न लावून दिले. दरम्यान, मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना साहिल याने वारंवार शारीरीक संबंध ठेवल्याने पिडीता तीन महिन्याची गरोदर राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पती सहील तडवी, पीडीतेची आई, पडितेचा मामा, सासू जमिला…
जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलीक यांना अटक केल्यानंतर एकीकडे भाजपातर्फे मंत्रीपदाची मागणी जोर धरत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादीतर्फे विविध ठिकाणी आंदोलने सुरू केली आहे. यातच राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. चंपाने समोय्यांना हाताशी धरून टरबूजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही, अशी खोचक आणि घणाघाती टीका अनिल पाटील यांनी केली आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते. आमदार अनिल पाटील हे यापूर्वी भारतीय जनता पक्षात होते. त्यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमळनेर…
प्रभारी एच.के. पाटील, पल्लम राजू , ना. बाळासाहेब थोरात, के.सी.पाडवी यांचेसह विविध पदाधिकार्यांची उपस्थिती शिर्डी प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा व डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा आढावा सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 22 रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, मा.केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितत स.11वा.. साई सृष्टी मंगल कार्यालय, कोपरगांव रोड, शिर्डी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ तांबे म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून बलात्कार केल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी साबीर शेख जहूर (वय-२६) याचे अल्पवयीन मुलीशी ओळख होती. याचा गैरफायदा घेत १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलीला साबीर शेख हा त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने…
जळगाव प्रतिनिधी । माहेरहून ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ परिसरातील माहेर असलेल्या विवाहिता श्वेता राजा हरित (वय-४०) यांचा विवाह वसंत नगर वसई, मुंबई येथील राजा ब्रह्मानंद हरित यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीला एक आठवड्यानंतर पती राजा ब्रह्मानंद हरित यांनी माहेरहून ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहिता यांना शिवीगाळ व गांजपाठ केला. त्यानंतर विवाहिता यांनी ५० हजाराची पूर्तता न केल्यामुळे पती राजा हरित यांनी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. यामध्ये सासू आणि…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील भिलपूरा चौकात बेकायदेशीररित्या धारदार चॉपर घेऊन फिरणाऱ्या संशयिताला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील चॉपर हस्तगत केला आहे. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (वय 26) रा. कांचन नगर जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल पाटील, सहाय्यक फौजदार रवींद्र बोदडे, इंदल जाधव, अनिल कांबळे हे नाकाबंदीसाठी भिलपूरा चौकात गस्तीवर असतांना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुमारास हिस्ट्रीशीटर असलेला गुन्हेगार राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके…
जळगाव प्रतिनिधी ।/ जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता समुदाय आधारीत शेतकरी कार्यशाळा उत्साहात पार पडली. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी नाविन्याचा ध्यास धरण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की देशात 52 टक्के शेतकरी असून शेतकऱ्यांनी स्वत: नेतृत्व करण्याची गरज असून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत व्यापारी दृष्टीकोन ठेवला पाहिजे यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) योजना आधारवड ठरणार आहे. निर्यातक्षम केळी घड व्यवस्थापनासाठी अनुदानित तत्वावर योजना राबविण्यासाठी 7 कोटीचा प्रस्तावास शासनाची…
यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मोहराळा येथे मध्यरात्री एकाने ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी जाळून टाकण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सुरेश ज्ञानेश्वर गिरी (वय-३२) रा. मोहराळा ता. यावल हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे कामासाठी (एमएच १९ डीटी ७५४३) क्रमांकाची बजाज प्लॅटीना कंपनीची दुचाकी आहे. दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान गावातील राहणारा संशयित पंकज साहेबराव पाटील याने ज्वलनशील पदार्थ टाकून दुचाकी पेटवून दिली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली…

