भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजमधील आनंद लॉजमध्ये पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने सोमवार, 21 रोजी दुपारी अचानक छापा ५ पाच वेश्यांसह जिल्ह्यातील ५ आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना हॉटेलमध्ये अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस पथकाने छापा टाकला. यात पोलिसांच्या पथकाने लॉजमधून पाच वेश्यांसह पाच आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे शिवाय अनैतिक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील विवाहिता माहेरी जात असल्याचे सांगून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील रहिवाशी प्रिती योगेश नेमाडे (वय-२८) या विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अंजाळे ता. यावल येथे माहेरी जाते असून घरातून गेल्या. सायंकाळ पर्यंत त्या माहरी घरी न पोहचल्याने पती योगेश नेमाडे यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती कुठेच मिळून न आल्या नाही. दरम्यान, पती योगेश नेमाडे यांनी सोमवारी २१ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली.…
धरणगाव प्रतिनिधी । संत तुकाराम महाराज बिजनिमित्त शहरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, लहान माळी वाडा परीसरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अखंड हरिनाम किर्तन सप्ताह साजरा झाला. सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखीत विठू माऊली – आई रखुमाई यांच्या मूर्ती तसेच जगद्गुरू तुकाराम महाराज यांची प्रतिमा होती. पालखीच्या समोर गावातील व परिसरातील असंख्य युवक तसेच भाविकांनी सवाद्य लेझीम पथकातून सहभाग नोंदवला. लेझीम च्या माध्यमातून विविध प्रकारचे लेझीम प्रकार शिस्तबद्ध रीतीने खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये युवकांचा उत्साह, शिस्त, आनंद…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ शुक्रवार १८ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी होती. दरम्यान, संशयित आरोपी भुषण तुकाराम कोळी रा. डांभुर्णी ता. यावल याने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील यांनी दिली आहे. त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कोठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी रविवारी २० मार्च रोजी नशिराबाद…
धरणगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियान संदर्भात धरणगाव येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत प्रमुख विषय राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियानास प्रत्येक गावा, गावात जाऊन सभासद नोंदणी अभियान करणे, आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धरणगाव शहराच्या प्रत्येक वार्डात राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी तयारी करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गण, गटात बैठाका लावणे, त्यात गावा, गावात युवक शाखा ओपनिंग करणे, गण-गटात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करणे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या…
पारोळा प्रतिनिधी । शेतीची वाटणी हवी आहे या मागणीसाठी पोटच्या मुलाकडून आई-वाडीलांना शिवीगाळ करून काठीचने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात मुलासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ राजाराम पाटील (वय-८५) रा. शिरसमण ता. पारोळा जि.जळगाव हे आपल्या पत्नी साखरबाई सह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महादू दशरथ पाटील हा पत्नी व मुलांसह वेगळा राहतो. दरम्यान, शेती नावावर करून द्यावी अशी मागणी मुलगा महादू याने आईवडीलांकडे तगादा लावला होता. शेती नावावर करत नसल्याच्या रागातून महादू दशरथ पाटील याने १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता आईवडील…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील नाथसेन नगरात किरकोळ कारणावरून प्रौढ व्यक्तीला एकाने विट मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, देविदास सिताराम इंगळे (वय-५५) रा. नाथसेन नगर, रामेश्वर कॉलनी हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शनिवार १९ मार्च रोजी देविदास इंगळे हे रात्री घरी असतांना त्यांच्या गल्लीत राहणारा राकेश सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) याला तू काय करतो असे विचारले. याचा राग आल्याने राकेश सपकाळे याने रस्त्यावर पडलेली विट देविदास इंगळे यांच्या डोक्यावर मारली. यात त्यांना दुखापत झाली. तर देवीदास इंगळे याचा मुलगा सतिश आणि सुन यांना…
जळगाव प्रतिनिधी । शिवीगाळ का करतो असे विचारल्याच्या कारणावरून दोन जणांना शिवीगाळ करून धारदार चॉपरने वार केल्याची घटना तेली चौकात घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण प्रकाश कोळी (वय-३५) रा. पांजरापोळ पाण्याची टाकीजवळ हा शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत रंगपंचमी खेळत होता. यावेळी पप्पू मराठे व एका दुचाकीस्वारामध्ये वाद झाला. यावेळी नारायण कोळी याने हा वाद मिटवित तो सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराकडे जात असतांना तेली चौकात पराग राजेंद्र पाटील (वय-१९) हा तरुण शिवीगाळ करीत होता. नारायण याने पराग याला शिवीगाळ का करतो असे बोलल्याने त्याचा राग आला. त्याने रागाच्या…
जळगाव प्रतिनिधी । । शहरातील नेरी नाका येथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करून विनयभंग व धमकी देणाऱ्या व्यक्तीला गर्दीतील नागरीकांकडून चोप दिल्याचा घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी ह्या गुरूवार १७ मार्च रोजी शहरातील नेरी नाका येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ड्युटीवर होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सलीमखान आरमानखान पठाण (वय-५१) रा. पाळधी मोहल्ला ता. धरणगाव हा महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे आला. व मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर द्या असे सांगितले. आपल्याकडे मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर नसल्याचे महिलेने सांगितले. याचा राग आल्याने सलीमखान…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील बाभुळगाव शिवारात मध्यरात्री बिबट्याने गोहऱ्यावर हल्ला करून फडशा पडला आहे. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर धनगर पाटील याचे बाभुळगाव शिवारात शेत असून त्यांनी शेतात काल सोमवारी १५ मार्च रोजी गुरे बांधली होती. दरम्यान मध्यरात्री बिबट्याने गुरावर हल्ला करून फडशा पाडला आहे. एक महिन्या पूर्वी देखील परिसरातील काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. आज सकाळी गुराचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांनी तलाठी आशिफ शेख आणि एरंडोल वनविभागाचे अधिकारी राजकुमार ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले. या…

