जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके येथे घरासमोर उभे प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा लांबवल्याची घटना शुक्रवार २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात एका जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळके येथील गोपाळ वाल्मिक सोनवणे वय २९ यांच्याकडे एम.एच.१९ ए.क्यू.७५४४ या क्रमांकाची प्रवासी वाहतुक रिक्षा आहे. लॉकडाऊनपासून धंदा नसल्याने त्यांनी ही रिक्षा घरासमोर उभी केलेली आहे. ते दुसर्याची रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवतात. शुक्रवारी दुपारी गोपाळ सोनवणे यांची पत्नी घरात काम करत असताना त्यांना अंगणात उभी रिक्षा राहुल भरत जाधव रा. वराड ता.जळगाव हा घेऊन जाताना दिसला. तो परत रिक्षा घेऊन येईल या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरातील रिक्षा चालकाचा अनैतिक संबधातून खून झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. आज खुनाची दुसरी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या खूनातील संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नरेश आनंदा सोनवणे (वय-२८, रा. राजाराम नगर, दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी तो शिवाजी नगरात राहणार्या आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी दोघे एका खोलीत बसलेले असतांना त्याठिकाणी विवाहित प्रेयसीलचा दुसरा प्रियकर आकाश सखाराम सोनवणे हा तिथे…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील समता नगरात अनैतिक संबधातून तरूणाचा खून झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार ( वय २८) हा तरूण एकटा राहत होता. अनैतिक संबंधातून तरूणावर संशयित आरोपी रात्री उशीरा त्याच्यावर एकाने चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या किंचाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रूग्णालयात हलविले. येथे उपचार सुरू असतांना सकाळी पाच वाजता त्याने शेवटचा श्वास घेतला. सागर नरेंद्र पवार हा…
यावल प्रतिनिधी । शहरातील सरस्वती विद्या मंदिर शेजारील मदन बळवंतराव भोईटे यांचे घरात शुक्रवारी २५ मार्च रोजी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागलेल्या घरांचे वयोवृद्ध कुटुंबीय रात्री उशीरापर्यंत बुलढाणाहुन परतल्यावर पंचनामान्याच्या कामास सुरूवात झाली आहे. याबाबत माहिती अशी की, यावल शहरातील सरस्वती विद्या मंदीर शेजरील राहणारे मदन भोइटे यांचे घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मदन भोईटे कुटुंबीय शुक्रवारी २५ मार्च रोजी सकाळी ६ वाजता नातेवाईकांकडे बुलडाणा येथे गेले होते. दुपारच्या वेळी सर्वत्र सामसूम असल्याने व बंद घरात आग लागल्यामुळे त्याची कल्पना बाहेर लवकर आली नाही. घरात सागवानी लाकडांचा धाबा असल्याने आगीने रौद्ररूप धारण…
जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाडी शिवारातून शेताच्या विहिरीवरून असलेले वायर, स्टार्टर, पेटी व इलेक्ट्रिक सामान असा एकूण १० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सतीश रामदास चौधरी ( वय-४५ ) रा. शेलवड ता. बोदवड जि.जळगाव यांचे जामनेर तालुक्यातील वाडी शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांनी ठेवलेले १० हजार ५०० रुपये किमतीचे १२० फूट वायर, स्टार्टर, पेटी व इलेक्ट्रिक सामान असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने २१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते २२ मार्च सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चोरून नेला आहे. हा प्रकार…
जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील मोकळ्या जागेवर पार्किंगला लावलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भिकन काशिनाथ सूर्यवंशी (वय-५१) रा. अष्टविनायक पार्क, जळगाव यांचे हे कामानिमित्त त्यांच्या मोटारसायकलने जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथे २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांनी हिवरखेडा रोडवर असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांची मोटारसायकल पार्किंग करून लावली होती. काम आटोपून ८.३० वाजता परत आल्यानंतर त्यांना मोटारसायकलजागेवर आढळून आली नाही. त्यांनी मोटारसायकलचा परिसरात शोधाशोध केली परंतु मोटारसायकल कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी जामनेर…
भडगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे शिवारात वनविभागाच्या जागेवर राहत असलेल्या मजुराला चाकूचा धाक दाखवत बकऱ्या चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, बापू खंडू पाटील (वय-६५) रा. वलवाडी ता. भडगाव जि. जळगाव हे वलवाडी शिवारात वास्तव्याला आहे. शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बकर्या व बकऱ्यांचे पिल्ले असून ते जोडधंदा करतात. दरम्यान गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ११.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन जणांनी येऊन त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून २८ हजार रुपये किमतीच्या ४ बकऱ्या व ४ पिल्ले जबरी चोरून नेले…
जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील तरुणाचा मारहाणीचा जाब विचारल्याचा कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश साहेबराव सोनवणे (वय-३२) रा. बेघरवस्ती खरजई ता.चाळीसगाव हा आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावात राहणारा प्रविण उर्फ मोन्या राजू सोनवणे रा. बायपास रोड, चाळीसगाव याने यापूर्वी गावातील पिंटू शिंदे या मुलाला मारहाण केली होती. यासंदर्भात बुधवारी २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता सतीश सोनवणे याने मुलाला का मारहाण केली? असा जाब प्रवीण सोनवणे यांना विचारला. याचा राग आल्याने प्रवीणने सतीशला मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरवात…
जळगाव प्रतिनिधी । राज्यपाल यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त केलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी अभिनंदन करून कौतूक केले अहे. याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील आणि जिल्हा मोटार वाहन परिवहन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भिकन सोनार यांना उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल २१ मार्च रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. दोघांना एका कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भकिन सोनार यांनी त्यांच्या सेवा काळात केलेल्या लिस्ट स्वरूपाचे गुन्ह्यांचा तपास सातत्यपूर्ण केल्याने…
जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. कन्हैय्या किसन खासले (वय-२०) रा. सुप्रिम कॉलनी जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याबाबत माहिती अशी की, कन्हैय्या खालसे हा पत्नीसह सुप्रिम कॉलनीत भाड्याच्या घरात वास्तव्याला आहे. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २४ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास कन्हैय्याची पत्नी हे घराबाहेर कामानिमित्त गेल्यानंतर कन्हैय्या एकटाच होता. त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नी घरी आल्यावर पतीने गळफास घेतल्याचे दिसताच एकच आक्रोश…

