जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठाने आयोजित केलेले युवारंग युवक महोत्सव उन्हाळ्यामुळे तुर्तास रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष भुषण भदाने व माजी जिल्हाध्यक्ष ॲड. कुणाल पवार यानी कुलगुरू यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे यंदा आंतर महाविद्यालयीन “युवारंग युवक महोत्सव” हा दि . १९ एप्रिल ते २४ एप्रिल २०२२ ह्या तारखांना होणार आहे . याचा कालावधीत भर उन्हाळ्या मध्ये सुमारे ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमान ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात जळगाव जिल्हा रोज चर्चेत आहे त्या तापमानामध्ये ऐन परिक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शैक्षणिक हिताचा विचार न करता विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवारंग…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रविण पाटील । तालुक्यातील वावडदा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीत रविंद्र कापडणे यांचे नम्रता पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले असून विकासोवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. या संदर्भात असे की, जळगाव तालुक्यातील वावडदा विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक ३ एप्रिल रोजी पार पडली. यात रविंद्र कापडणे यांचे नम्रता पॅनल व राजेश वाडेकर यांचे शेतकरी राजा विकास पॅनल हे समोरा समोर होते. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नम्रता पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यात नम्रता पॅनलचे १३उमेवार विजयी झाले. विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते जनरल मतदार संघ भोळे अनिल बारसु (२४८), राठोड मिश्रीलाल प्रेमा(२४७), पाटील मोतिलाल माधव (२४६), पाटील…
जळगाव प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात खूनाची घटना ताजी असतांना आज सांयकाळी पुन्हा एका तरूणाचा चॉपरने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. महंमद मुसेफ शेख इसाक (वय-४०) रा. शिवाजी नगर जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी नगर हुडको परिसरात राहणारा तरूण महंमद मुसेफ शेख इसाक या तरूणावार चॉपरने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अज्ञात हल्लेखोर हे खून करून पसार झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू…
लाईव्ह महाराष्ट्र विशेष : खान्देशवासियांनो जळगाव, धुळे आणि नंदुरबार या आपल्या खान्देशात उन्हाची तीव्रता राज्यात सर्वाधिक जाणवते. त्यातल्या त्यात आपल्या जळगाव जिल्ह्याचा पारा हा मे महिन्यात तर चाळीशी ओलांडून ४७ ते ४८ अंशांवर तापमान जाऊन पोहचते . आतातर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४४ अंशांची पातळी गाठली असल्याने उन्हाच्या तीव्र झळा सकाळपासून ते सायंकाळी ७ वाजे दरम्यान जाणवत आहे. बाहेर पडणेही कामानिमित्त असह्य झाले आहे. या तीव्र उन्हापासून आपला आणि आपले कुटुंबीयांचा बचाव करणे अधिक महत्वाचे आहे. तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करतेच. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर तुमच्या जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे.उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज;- शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट नेहमीप्रमाणे आली असून पारा ४२ ते ४४ अंशावर गेला असल्याने सकाळी १० वाजल्यापासूनच चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला असून मेहुणबारे येथील ४८ वर्षीय शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी असे मयताचे नाव आहे . मात्र त्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील सुंदरलाल गढरी हा शेतमजूर बकऱ्या चारण्यासाठी मेहूणबारे परिसरात गेले होते. सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेला असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते घरी परतले. . त्यांना डॉक्टरकडे नेले असतानाच त्यांचा मृत्यू झाला.…
पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव शिवारातील शेतातील झोपडीला अचानक लागलेल्या आगीत ३ लाख रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पारोळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण गुलाबराव पाटील (वय-३०) रा. आडगाव ता.पारोळा यांचे आडगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४७ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी झोपडी बनवली असून त्या झोपडीमध्ये त्यांनी ३० क्विंटल कापूस भरून ठेवला होता. दरम्यान १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागल्याने आगीत जवळपास २५ क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख रुपये किमतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पारोळा…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मुसळी येथील प्रौढ व्यक्तीने गावाबाहेर असलेल्या खळ्यात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, पांडूरंग पुंडलिक जाधव (वय-५०) रा. मुसळी पो. वराड ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला होते. शुक्रवारी १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी दसुरे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…
नाशिक वृत्तसंस्था । नाशिक येथील देवळाली ते घोटी दरम्यान मुंबईकडून जयनगरला जाणाऱ्या पवन एक्सप्रेसचे १० ते १२ डबे रुळावरून रविवारी दुपारी घसरले. यामुळे मध्य रेल्वेकडून ११ गाड्या रद्द करण्यात आल्या. याबाबत माहिती अशी की, पवन एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे मुंबईहुन सुटणारी देवगिरी एक्सप्रेस, हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, पुरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच हावडा दुरांतो एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, उद्योगनगरी एक्सप्रेस, सुलतानपुर सुपरफास्ट एक्सप्रेस, पंजाब मेल, पटना-जनता एक्सप्रेस, सेवाग्राम या सर्व गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच पंचवटी एक्सप्रेस (१२१०९/१०), नंदीग्राम (११४०१), हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी (१७६११/१२), पुरी सुपरफास्ट (१२१४५/४६), अमरावती…
जळगाव प्रतिनिधी । इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनाच्या वतीने टॉवर चौकात थाली नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची उपस्थिती होती. याबाबत माहिती अशी की, केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह गॅसचे दरवाढ मोठ्या प्रमाणावर केली आहे. इंधन दरवाढीने सर्व सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वाढत्या महागाईच्याविरोधात उठवला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाई विरोधात ‘थाली बजाओ’ आंदोलन युवासेनेच्यावतीने करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगावातील शास्त्री टॉवर चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत थाली बजाओ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख पियुष गांधी, युवासेना महानगरप्रमुख विशाल वाणी, विद्यापीठ संपर्क युवा…
जळगाव प्रतिनिधी । बोरींगच्या वायरमुळे झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत संपुर्ण घर जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. अग्निशमन पथकाच्या दोन बंबामुळे ही आग आटोक्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, याबाबत माहिती अशी की, सिंधी कॉलनी कॉलनीतील सेवा मंडळच्या समोर दिलीप कन्हैयालाल पमनानी यांच्या मालकीचे घर आहे. त्यांनी हे एका महिलेला भाड्याने दिले आहे. ही महिला काही दिवसांपासून हरिव्दार येथे गेली आहे. त्यामुळे सदरचे घर बंद आहे. रविवारी पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रुप धारण केले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार काही वेळातच चालक विक्रांत…

