जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हाडदे शिवारात शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉटसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मीक आगीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव कुऱ्हाडदे येथील सागर दादाजी नरोटे वय २८ यांचे कुऱ्हाडदे शिवारात ३ एकर शेती आहे. या शेतात त्यांनी मका लावलेला आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतावरुन गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉर्टसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागली. नेहमीप्रमाणे सकाळी शेतकरी सागर नरोटे हे शेतात येत असताना त्यांना मक्याला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी शेतातील इतर कामगारांची सोबत पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । द्रौपदी नगरातील बंद घर फोडून घरातील कपटातून सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील दौप्रदी नगरातील भगवान भोमा पाटील हे एका खासगी कंपनीत मार्केटींग मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते मुळचे पारोळा येथील रहिवाशी असून ते पत्नी जयश्री व मुलगा अंश अशांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे सासरे कृष्णा पाटील हे शहरातील अयोध्या नगरात राहतात. भगवान पाटील यांच्या सासूचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे बुधवारी २० एप्रिल रोजी रात्री घराला कुलूप लावून ते पत्नी व मुलाला घेऊन अयोध्यानगरात आले होते. याच दरम्यान, गुरुवारी २१ एप्रिल रोजी सकाळी…
पाचोरा प्रतिनिधी । विवाहितेला तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत शरीरसंबध ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहिता पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. १९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान विवाहिता ही बकऱ्यांसाठी चारा आणत असतांना संशयित आरोपी नितीन एकनाथ जाधव याने विवाहितेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. विवाहितेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी विवाहितेचा पती संशयित आरोपी नितीन जाधव याच्याकडे गेला असता सोनाली जाधव, संदीप जाधवी, नितीनचा पाहुणा, नितीनीची आत्या जिजाबाई,…
मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून फोन टॅपींग प्रकरण सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणातील चौकशीत अजून एक मोठा गौप्यस्फोट समोर आला असून खा. संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे याची टोपण नावे वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना राज्यातील काही राजकारण्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण आता गंभीर वळणावर गेल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात आधीच कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून यात तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचाही समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांनी आपले जबाब नोंदविले असून सोबत सहा साक्षीदारांचेही जबाब घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सुरू…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, निलेश जीवन भाट (वय-३०) रा. कंजरवाडा, सिंधी कॉलनी, जळगाव हा चालक असून खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात दुचाकी (एमएच १९ बीझेड ३७१५) आले. त्यांनी त्यांची दुचाकी काँग्रेस भवन समोर पार्क करून बाजारात खरेदीसाठी निघून गेला. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. निलेश भाट याने दुचाकीचा शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवार १९ एप्रिल रोजी…
यावल प्रतिनिधी । गिरडगावजवळील केळीच्या बागेला मंगळवारी १९ एप्रिल रोजी दुपारी आग लागून साडेपाच हजार केळी खोड जळाल्याने दोन शेतकर्यांचा सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. चार तासानंतर यावल नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळवले. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील गिरडगाव येथील आदीवासी पावरा वस्तीला लागून गोरख पाटील व बापू ठाकूर रा. किनगाव ता. यावल यांची शेती आहे. यंदा या दोघांनी शेतात केळीची लागवड केलेली आहे. मंगळवारी १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतातील केळीच्या बागाला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच पोलिस पाटील अशोक पाटील, एस.टी. चालक भैय्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बापू पाटील, मधुकर पाटील यांनी तातडीने…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील मारोती पेठ येथील १८ वर्षी तरूणाने रात्री धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसनजीत प्राणकीशन कबीराज (वय-१८) रा. बलीदेवांगंज जि. हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु. मारोती पेठ, जळगाव हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागिर म्हणून काम करण्यासाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी १८ एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री १० वाजता तो आपल्या सहकार्यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील…
पालकमंत्र्यांच्या हस्ते संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचे भूमिपुजन धरणगाव प्रतिनिधी : वारकरी तत्वज्ञान हे सत्य, सदाचार आणि प्रबोधनाच्या मजबूत पायावर उभे आहे. आज खर्या अर्थाने समाजाला याच दिशादर्शक ठरणार्या प्रबोधनाची गरज असून ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हे काम होईल असा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. संस्थेच्या कार्यालयाच्या भूमिपुजन प्रसंगी बोलतांना ना.गुलाबराव पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम महत्वाचे असून यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील दिली. वारकरी संप्रदायाशी आपली पहिल्यापासून नाळ जुडलेली असून या माध्यमातून आपल्याला कायम उर्जा मिळत असल्याचेही पालकमंत्र्यांनी नमूद केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…
जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या आवारात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. प्रशासकीय इमारतीजवळ या मिरवणूकीचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातील सुप्रसिध्द विचारवंत डॉ. अशोक राणा यांनी “पुरोगामी चळवळीच्या दृष्टिकोनातून विकसनशील भारत” या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.म.सु.पगारे, प्रा.जे.बी.नाईक, प्रा.दीपक दलाल, एस.आर.गोहिल, प्रा.राकेश रामटेके, प्रा. किशोर पवार, प्रा.रमेश सरदार, अजमल जाधव, राजू सोनवणे, मनोज वराडे, जगदीश सुरळकर, संजय सपकाळे, अरुण सपकाळे, जयंत सोनवणे, भीमराव तायडे, भैय्या पाटील, दुर्योधन साळुंखे, अमृत दाभाडे, वैशाली वराडे, अशेाक पाटील, आदी शिक्षक,…
जळगाव प्रतिनिधी । यावल येथील भाजपा कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातील मान्यवरांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्व उपस्थितांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , भाजपा शिक्षक आघाडीचे पी. एस. सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपालसिंग पाटील, सरचिटणीस परिस नाईक, भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष बबलू घारू, ललित परमार्थी, सागर मोरे, सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष स्नेहल फिरके…

