Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक २०२२ अंतर्गत ७७ गट व १५४ गण यांची प्रारूप प्रभाग यादी जाहीर करणत आली आहे. यासंदर्भात हकरती असतील त्यांनल जिल्हाधिकारी कार्यालयात ८ जून रोजीच्या पुर्वी दाखल करण्यात यावे. याची सुनावणी विभागिय आयुक्त यांच्या कडे १० जून रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. जिल्हा परिषदगट क्रमांक गटाचे नाव । ग्रामपंचायतींची संख्या । एकूण समाविष्ट गावे चोपडा तालुका१ विरवाडे १३ २४२ अडावद ८१ ६३ अकुलखेडा १७ २२४ लासुर १५ १९५ चहार्डी १६ १८६ वर्डी २१ २५ यावल तालुका७ किनगांव बु ९ १३८ दहिगांव १२ १९९ न्हावी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीने नोटीस बजावली असून पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस असल्याचे समजते. देशात सध्या ईडीचाच बोलबाला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात देखील महाविकास आघाडीचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काही दिवसांपूर्वीच ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागले होते तर खडसेंचे जावई यांना ईडीने अटक केली होती. नुकतेच एक मोठी बातमी समोर येत असून एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीने नोटीस बजावली असून…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामनगरात सट्टा जुगार खेळविणार्‍या तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून २ हजार ४९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामनगर परिसरात सट्टा जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्याच्या सुचना पोउनि रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील यांना दिल्यात. त्यानुसार बुधवार १ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पथकाने रामनगर परिसरात सट्टा व जुगार खेळविणार्‍यांसह खेळणार्‍यांवर धाड टाकली. याठिकाणाहून पळून जात असतांना रंगनाथ रमेश वाणी (वय-४३, रा.…

Read More

धरणगावात शिवसेनेचा मेळावा उत्साहात : आगामी निवडणुकांसाठी फुंकले रणशिंग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथील श्रीजी जिनींगच्या परिसरात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आयोेजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. तर ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले त्या भाजपच्या खासदारांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याचे सांगत याचे योग्य वेळी उत्तर दिले…

Read More

पोकरा योजनेच्या संबंधित अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी गौरव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुक्यातील सोनवद परिसरातील गावांना असलेल्या पोकरा योजनेअंतर्गत असलेल्या अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे तातडीने अधिकार्‍याची नेमणूक करून प्रस्तावित असलेल्या प्रकरणे मंजूर करण्याची मागणी परिसरातून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पष्टाणे, अनोरा, धानोरा, गारखेडा, बाभळे, उखळवाडी, भामर्डी या ठिकाणी शासनाच्या पोकरा योजनेअंतर्गत कंपनीच्या उमेदवारांचे नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे हवे त्या साहित्याची ऑनलाइन पद्धतीने मागणी करावी लागतात, त्यानंतर कंपनीचे अधिकारी शेतात येऊन त्या ठिकाणी शेतातील फोटो काढून पूर्वसंमती देतात. त्यानंतर शेतातील लागणाऱ्या साहित्यांची खरेदी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कारागृहात नेत असतांना पोलीसांच्या हाताला झटका देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला कैदी महेश शिवदास दीक्षे (वय-३०) रा. लोणी बुद्रुक ता. रिसोड जि. वाशिम याला अटक करण्यात आले होते. पुढील कारवाईसाठी कैद्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुरुवारी 19 मे रोजी भुसावळ येथून जळगाव येथील जिल्हा कारागृहात ट्रान्स्फर होण्यासाठी भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व पो.कॉ. ईश्वर संजय भालेराव शासकीय वाहनाने जिल्हा कारागृहात दुपारी १२ वाजता आणण्यात आले होते. कैदी महेश…

Read More

जळगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य करून खून केल्याच्या आरोपातून एकाची जळगाव जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील टोनगांव येथे ७ वर्षीय मुलगा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला होता. २१ मार्च २०१९ रोजी दुपारी गावातील ७ वर्षीय मुलगा अंगणात खेळत असतांना पळवून नेल्याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, २२ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह पाचोरा रोडवरील एका केळीच्या शेतात आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. भडगाव पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित…

Read More

धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तहसील कार्यालयात तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. यावेळी त्यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना समन्वय ठेवण्याचे आवाहन केले. आज शुक्रवार दि. १३ मे रोजी तहसिलदारनितीनकुमार देवरे यांच्या कक्षात तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्यात आली. याप्रसंगी तहसिलदार श्री. देवरे यांनी सर्व विभागांना पूर्वतयारीच्या सूचना दिल्या. यात नगरपालिका, विद्युत विभाग, आरोग्य विभाग व पंचायत समिती विभागांनी आढावा घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देणेबाबत आदेश निर्गमित केले. तसेच १ जूनपासून तहसिल कार्यालयात कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात येणार असून नागरिकांनीही दक्ष राहणेबाबत सूचना विविध विभागांनी द्याव्यात असे आदेश देण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या सुप्रिम कॉलनी परिसरात घरगुती गॅस अवैधरित्या चारचाकी वाहनात भरून गैरवापर करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या शिवशाही हॉटेलच्या शेजारी एका भिंतीच्या आडोशाला तात्पुरते शेड बनवून घरगुती गॅस सिलेंडरच्या वापर अवैधपणे वाहनात भरून त्यांचा गैरवापर होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता छापा टाकून संशयित आरोपी विजय शंकर जाधव वय 52 रा. सुप्रीम कॉलनी खूबचंद नगर जळगाव, याला अटक केली. त्याच्याकडून घरगुती गॅसने भरलेले दोन सिलेंडर तसेच…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचपूरा येथे शेतकरी संवेदना अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रम तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शासकीय योजना बद्दल माहिती देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबत निराधार महिलांना जिवनावश्यक किट, गरजूंना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. प्रास्तविक कैलास पाटील यांनी केले तर आभार राजेंद्र सर मानले. याप्रसंगी मंडळाधिकारी सुरेश बोरसे, तलाठी राहुल ढेरंगे, सरपंच, कैलास पाटील, उपसरपंच, महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More