लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आपल्या आयुष्यातील आईचं महत्त्व शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येणार नाही. आज महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आईचं आज निधन झालं आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धावपकाळाने पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.सरस्वती पाटील यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनापश्चात 1 मुलगा, सून, 2 मुली असा परिवार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व संस्कार केला या संस्कारांच्या शिदोरीवरच पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत. सरस्वती यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर राज्यातील अनेक दिग्गज…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
चोपडा ग्रामीण पोलीसात एकावर गुन्हा दाखल चोपडा-प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० जूलै रोजी रात्री ९ वाजता मुलगी घरी असतांना राहूल अशोक सोनवणे रा. धुळे याने तिला काहीतरी सांगून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर मुलगी मध्यरात्री दीड वाजता घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. पिडीत मुलीच्या आईने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : गावाकडे तलाठ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत असतात तर चक्क गुरुवारी रात्री रावेर शहरातील स्टेशन जळगावात दारु पिऊन अंडी विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा करताना एक व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. परंतु या प्रकरणाचा कोणतीही गुन्हा दाखल झाला नाही. जळगाव तालुक्यातील एका गावातील तलाठ्याने अंडा पाव विक्री करणार्या विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा घालताना. चक्क विक्रेत्याशी डोके लावले व अंडी विक्रेत्याला कारवाईची धमकी देखील दिली. मात्र विक्रेत्याने देखील पोलिसाची धमकी दिली. तळीराम तलाठ्याच्या इतर सहकार्याने वाद मिटवला. दोघांनी धूम ठोकली असली तरी या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. धिंगाणा घालणार्या तलाठ्याकडे महसूल प्रशासनाचा छुपा असलेला…
पिंप्री ता. धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले आहे. हे काम केलेल्या निविदाप्रमाणे करण्यात आलेली नसून घोळ करण्यात आल्याची तक्रार नितीन धनगर याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. निवीदा काढून बांधकामाला सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान निविदाप्रमाणे ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. याबाबत शहरातील नितीन राजेंद्र धनगर या तरूणाने जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तक्रार देवून एक महिना होवूनही कुठल्याही तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोपही नितीन धनगर या तरूणाने लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील खुनाचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. दोन दिवसापूर्वी शाहूनगरातील जळकी मील भागात खून झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा हरीविठ्ठल नगर परिसरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने काही मिनिटात एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून दर आठवड्याला कुठे ना कुठे खून झाल्याची घटना कानावर येत आहे. दोन दिवसांपूर्वी गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील गणपती मंदिर बाजार पट्टा…
भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवस पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याभरात दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळ जवळ एक हफ्ता विश्रातीनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यासह मराठवाडा आणि घाट परिसरातदेखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यभरात दमदार पावसानं काहजेरी लावली. मुसळधार पावसाळामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जून महिन्यात राज्यातील इतर भागांप्रमाणेच पुणे जिल्हातसुद्धा पावसानं पाठ फिरवली होती, मात्र जुलै महिना सुरु होताच पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. काही दिवसांच्या दमदार बॅटींगनंतर पावसानं एक आठवडाभर विश्रांती घेतली होती,…
गेली अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकरला शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे आपली सत्ता सोडावी लागली. यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन केलं आहे. नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. पनवेलमध्ये आयोजित भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे ढकलाचा होता. नगरपालिका, पालिका निवडणुक लागली आहे. आपल्या मुंबई…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील रायसोनी नगरात राहणाऱ्या विवाहितेला हुंड्याच्या पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवारी २२ जुलै रोजी दुपारी पतीसह इतरांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रायसोनी नगर येथे माहेर असलेल्या कृतिका गिरीश गायकवाड (वय-२६) यांचा विवाह अहमदनगर येथील गिरीश प्रफुल्ल गायकवाड यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती गिरीश गायकवाड यांनी हुंड्याच्या पैशांची मागणी केली. त्यानंतर विवाहितेने पैसे दिले नाही म्हणून तिला शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने पैसे आणले नाही…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:दिपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंच्या टीकांना उत्तरं दिली. शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी संघर्ष केला, कट्टर शिवसैनिकांची बदनामी केली जातेय, दीपक केसरकर यांनी आपल्या गटाची बाजू मांडली. शिवसैनिकांचा अपमान करू नका, ज्यांचा आदर केला त्यांच्याविरोधात बोलायची वेळ आणू नका,” असा सल्ला केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.केसरकर पुढे म्हणाले, “संजय राठोडांचा विवाह असताना ते शिवसेनेसाठी तुरुंगात गेले होते. अनेकवेळा तुरुंगात गेले याला शिवसेना म्हणतात. या सगळ्यांमुळे सेना ताठ उभी आहे. बाळासाहेब एकवचनी होते. शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रिपदाचं वचन दिलं होतं. त्यांना मिळालं नाही तरी शिंदेसाहेब गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांनी पद देऊ करुनही त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसशी आघाडी…
पुणे येथील धनकवडी व बिबवेवाडी परिसरात दोन बंद सदनिकांवर डल्ला मारून चोरट्यांनी 5 लाख 60 हजार रुपयांचे दागिने, ऐवज चोरी केला. अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनवकडी परिसरातील गणेश व्हिला सोसायटीतील एका बंद खोलीत चोरट्यांनी हात साफ करून 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरी केले. याप्रकरणी नवनाथ कांबळे (वय 20, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि.21) सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चोरी केली आहे. बिबवेवाडी येथील अनंत वसाहत येथीलही एका बंद सदनिकेवर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारून रोकड, सोन्याचे दागिणे व परदेशी चलन असा 4 लाख रुपयांचा ऐवज…

