Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

कोळंबा येथे जाऊन साडी चोळी देऊन केला गौरव कोळंबा (ता चोपडा) : बिबट्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तापी नदीत उडी घेतलेल्या कोळंबा येथील लताबाई बाविस्कर यांचा आज जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी साडी चोळी देऊन सत्कार केला. चार दिवसांपूर्वी शेतात लताबाई दिलीप बाविस्कर या शेंगा तोडत असताना बिबट्या त्यांच्या दिशेने येताना दिसला. त्यावेळी एकीकडे काटेरी झुडपे तर दुसरीकडे तापीमाई असल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विलंब न लावता लताबाई यांनी तापी नदीमध्ये उडी घेतली. दुपारी चार वाजेला घडलेल्या या घटनेनंतर केळी खांबाच्या सहाय्याने त्या दुसऱ्या दिवशी पोहोत पोहत अमळनेर तालुक्यातील नीम गावाच्या पांथ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांना…

Read More

जळगाव प्रतिनिधी । कुटुंबिक वादातून संतापाच्या भरात कुणाला काहीही न सांगता ३२ वर्षीय विवाहिता शिवकॉलनीतून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली ज्ञानेश्वर पाटील (वय-३२) रा. शिवकॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. ५ सप्टेंबर रोजी घरात झालेल्या कौटुंबिक वादातून कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्या आहेत. त्याच्या नातेवाईकांसह पती ज्ञानेश्वर पाटील यांनी विवाहितेचा सर्वत्र शोध घेतला परंतू अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत रामानंद नगर पोलस ठाण्यात धाव घेवून हरविल्याची खबर दिली. याबाबत रामानंद नगर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुनिल पाटील करीत आहे.

Read More

जळगाव: शहरातील अजिंठा चौकातील बाफना शोरून समोरून एका तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव हरीदास निंबाळकर (वय-२४) रा. कानळदा रोड, शिवाजी नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वैभव निंबाळकर हा (एमएच १९ सीएस ४०७१) क्रमांकाची दुचाकी घेवून अजिंठा चौकातील बाफना कंपनीच्या समोर आला होता. त्यावेळी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. वैभवने सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू त्याला दुचाकी कुठेही मिळाली नाही.पाच दिवसानंतर…

Read More

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल मेहरुण परिसरातील सारा हॉस्पिटलजवळून आयशर ट्रक लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मेहरुण परिसरातील रामनगरात जावीद लतिफ पटेल हा तरुण वास्व्यास असून त्याच्याकडे (एमएच १९ सीवाय ४८४६) क्रमांकाचा आयशर ट्रक आहे. हा ट्रक चालवून तो कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. दि. ८ रोजी रात्री ११ वाजता नाशिकहून आल्यानंतर त्यांनी आपला ट्रक सारा हॉस्पिटलच्या मुख्य रस्त्यावर लावला होता. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी लांबवून नेला. सकाळी जावीद यांचे वडील दूध घेण्यासाठी गेले असता, त्यांना आपल्या मुलाचा ट्रक याठिकाणी दिसून आला नाही. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत…

Read More

जळगाव प्रतिनिधी । नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ओमकारनगरात झाड कोसळल्याने एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. रविवारी ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाला. यावेळी शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी झाली होती. तर नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ओमकार नगरातील के.के. हॉस्पिटल समोर आलेले मोठे झाड कोसळले आहे. या मध्ये एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. मोठे झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. जळगाव महानगरपालिकेच्या वतीने पडलेले झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले होते.

Read More

एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । शिरसोली दापोरा रोडवर काहीही कारण नसताना तरुणाशी वाद घालून चौघा भावांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल अशोक ढवळे (वय-३८) रा. ल हनुमान मंदिर शेजारी दापोरा जळगाव हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिरसोली ते दापोरा रोडवर असलेल्या एका ठिकाणी काहीही कारण नसताना अतुल ढवळे याच्याशी नाना दशरथ देवरे यांनी वाद घातला. त्यानंतर नाना दशरथ देवरे, रवींद्र दशरथ देवरे, बंडू…

Read More

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भुंकणाऱ्या कुत्र्याला बांधून ठेव असे सांगितल्याच्या कारणावरून तरुणाला लथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याची घटना सुप्रीम कॉलनी येथे घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल बाळू कोळी (वय-२४) रा.प्रेमाबाई शाळेजवळ सुप्रीम कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्याच गल्लीतील अमोल मोरे याचा कुत्रा रस्त्यावरून वारंवार भुंकतो व मागे लागतो त्यासंदर्भात अमोल मोरे याला सांगितले असता अमोलने राहुल कोळी याला शिवीगाळ व मारहाण करून काठीने मारहाण केली व दुखापत केल्याची घटना गुरुवार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली . दरम्यान कुत्रा मी बांधणार नाही, तुझ्याकडून जे…

Read More

राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते दिंडीचे पूजन लमांजन जळगाव: येथून आज श्री साईबाबा यांची पायी दिंडी रवाना झाली. याप्रसंगी दिंडीचे पूजन राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या 18 तारखेला ही दिंडी पायी प्रवास करून साईबाबांचे दर्शन घेणार आहे.दिंडीतील भाविकांनी सांगितले की, लमांजन येथून म्हसावद, डोमगाव, पाथरी, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा, पातोंडा, चाळीसगाव, नांदगाव मार्गे दिंडी अठरा सप्टेंबरला शिर्डी संस्थांमध्ये पोहोचेल. दिंडीच्या दौऱ्यादरम्यान भाविकांचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण याची व्यवस्था ठिकठिकाणी साई भक्तांनी केली आहे. मार्गस्थ होण्यापूर्वी दिंडीची पूजा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी जळगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव शहरातील जोशी पेठ येथे दोन जणांना बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अखिल शहा रहीम शहा (वय-४३) रा.जोशी पेठ जळगाव हे आपल्या दोन मुलांचं वास्तव्याला आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसताना मोबीन शहा सलीम शहा आणि रईस शहा नसीर शहा यांना त्यांच्या गल्लीत राहणारे वसीम बागवान आणि शहादुल्ला बागवान (पूर्ण नाव माहित नाही) रा. जोशी पेठ यांनी शिवीगाळ व करून मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा जाब अखिल शहा रहीम शहा…

Read More

जळगाव शहरातील असोदा रेल्वे गेट समोर तरुणाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश प्रकाश हजबन (वय-३८) रा. कला वसंत नगर आसोदा रेल्वे ₹गेट जवळ जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान त्याची मोटरसायकल एमएच १९ बीटी ५६०४ ही दुचाकी अज्ञात चोट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. दुचाकी चोरी केल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरेश आजपण याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही आढळून न आल्याने…

Read More