भुसावळ शहरातील एका दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह रायटर तुषार पाटील व खाजगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. एसीबीच्या या कारवाईने जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा खाकीला डागाळली आहे.मिळालेल्या माहिती नुसार, काही दिवसांपूर्वी बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर बाजारपेठ पोलिसांकडे कारवाईसाठी दिला होता मात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 15 लाखांची मागणी करण्यात आलीव सुरूवातीला तीन लाख रुपये घेवून नंतर पुन्हा 12 लाख रुपये मागण्यात आल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. ऋषी शुक्ला…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागात एक इसमाने गोळीबार केल्याची घटना दि.17 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किसन नजनपाटील यांना माहिती पडताच त्यांनी लागलीच आपल्या पथकाला याची माहिती देत संशयिताला अटक करीत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील छत्रपती शिवाजी नगराच्या मागील बाजूस असलेल्या हुडको परिसरात दि.17 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अवैध अग्नीशस्त्रातून फायर केल्याची बातमी मिळाली त्यावरुन संशयित आरोपीच हुडको शिवाजीनगर जळगाव भागात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक सखाराम बागुल, (वय 32, रा. शिवाजी नगर…
चाळीसगाव शहरातील नागदरोड परिसरातील एका शेतातील पत्राच्या शेडमध्ये गोलाकार बसुन, त्यामध्ये मानवी खोपडी ,लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळया धातुचा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुर, आगरबत्ती पुडा, लोखंडी आडकीत्ता व कापुराची पुजा मांडुन गुप्त धना करीता आघेरी कृत्य करुन जादुटोणा करणार्या ९ जणांच्या टोळीच्या गुप्तधन काढण्यापूर्वीच चाळीसगाव पोलिसांनी तांब्यात घेतले. याप्ररकणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे. वेळीच अघोरी कृत्य करणार्या जेरबंद केल्यामुळे चाळीसगाव पोलिसांचे कौतूक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार , दि.१५ रोजीच्या मध्यरात्री पासून ते दि.१६ रोजी सकाळी ०५ वा दरम्यान वरिष्ठाच्या आदेशाने चाळीसगाव पोलिसांकडून चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन…
घटनास्थळी हायवे पोलीस स्थानकाचे कर्मचारी दाखल जळगाव एरंडोल महामार्गावर सुरू असलेल्या अपघाताची मालिका कुठल्याही परिस्थितीत थांबण्याचे नाव घेत नसून आज देखील पुन्हा एकदा ट्रक व चार चाकीमध्ये अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव एरंडोल रस्त्यानजीक असलेल्या मुसळी फाट्याजवळ भरदा वेगाने जात असलेल्या ट्रकने चारचाकीला जोरात कट मारल्याने चार चाकी रस्त्याच्या कडेला गेली सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसत नाही. घटनास्थळी पाळधी महामार्ग पोलीस स्थानकाचे सहाय्यक फौजदार गुलाब मनोरे हवालदार संजय तेली. सलीम शेख. सूर्यवंशी पाळधी महामार्ग पोलीस यांनी सदर कार मधील लोकांना बाहेर काढला डीपीपासून बाजूला करून व ट्रक व ट्रक चालक याला पारधी पोस्ट चे कर्मचारी यांच्या ताब्यात…
तीन महिन्यांपूर्वी पळून जावून पाटणा देवी येथे केला होता प्रेम विवाह : घातपात असल्याचा माहेरकडील नातेवाईकांचा आरोपपाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये तीन दिवसांपूर्वी राहण्यास आलेल्या १९ वर्षाच्या नवविहितेने घरामागे असलेल्या ५० फुट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक धनंजय वेरुळे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक विजया विसावे यांनी भेट दिली. पती पत्नीत किरकोळ वाद झाला व आजी सासू, सासू चुलत सासू त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील…
जळगाव- धुळे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार हे धुळे येथे विमानाने जात होते. परंतु खराब हवामानामुळे विमानाला जळगाव विमानतळावर उतरावे लागले. त्यानंतर वाहनाने ते धुळे येथे रवाना झाले. धुळे येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धुळे येथे जात होते. परंतु जोरदार पाऊस व खराब हवामानामुळे त्यांचे विमान हे जळगाव विमानतळावर उतरावे लागले. त्यामुळे प्रशासनाची एकद धावपळ झाली. प्रशासनाला तात्काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वाहनांच्या ताफ्याची व्यवस्था करावी लागले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे धुळ्याकडे रवाना झाले.
पण अमळनेरला सभेचे आयोजन योजन का नाही ? जळगाव – राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आता मैदानात उतरले आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवार आपली शक्ती वाढविण्यासाठी येणार असून त्यांची पारोळा, मुक्ताईनगर आणि धरणगावात सभा होणार आहे. अशी माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभरात दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, ते लवकरच आपला राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. याच दौऱ्याच्या अंतर्गत ते जळगाव जिल्ह्यात येणार असल्याचे नुकतेच निश्चीत झाले होते. या दौऱ्यात दोन सभांचे स्थळ मात्र ठरले नव्हते. यावर शिक्कामोर्तब झाले असून शरद पवार हे ९ रोजी पारोळा,…
लवकरच होणार कामाला सुरुवात ; शिवसेनेचे प्रवक्ते पी.एम.पाटलांनी दिली माहिती धरणगाव तालुक्यातील विध्यार्थी व तरूणासाठी क्रीडा मंत्री गिरीशभाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने क्रीडा संकुलसाठी ५० लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते पी.एम.पाटील सर यांनी आज दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून लवकरच अपूर्ण कामाला सुरुवात होऊन विद्यार्थ्यांसाठी खुले केले जाईल जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच क्रीडा संकुल निधी अभावी कात टाकत होते धरणगाव तालुका क्रीडा संकुल साठी शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी तसेच क्रीडा शिक्षक प्रामुख्याने पी एम पाटील सर, संजय…
घटनास्थळी एलसीबीसह धरणगाव पोलीस दाखल धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे २४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरानजीक असलेल्या बांभोरी गावातील गिरणा नदी पात्रात एका २४ वर्षीय आशिष या तरुणाचा खून झाल्याची घटना दिनांक २३ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्यासह धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.
महाराष्ट्र जोडो अभियानाचे जळगांव येथे होणारे राज्य सम्मेलन यशस्वी होणार : गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी: येथील बिजासनी जिंनिग प्रेसींग येथे समविचारी संस्था, सामाजिक संघटना व विविध पक्ष यांची आज रोजी संवाद बैठक संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक रणजित शिकरवार यांनी केले. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, प्रा.करीम सालार, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, मोहन शिंदे, राम पवार, सुरेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, फारुक शेख, राजेंद्र वाघ, दिपक वाघमारे, रतीलाल चौधरी, योगेश पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सध्याची महागाई, बेरोजगारी आणि जगण्याचे प्रश्नाचे स्वैर खाजगीकरण यामुळे कष्टकरी – शेतकरी व मध्यम वर्गाचे रोजचे जगणे अवघड होत चालले आहे.…

