Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव (प्रतिनिधी ) सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणी साठी आज ९ ऑगष्ट क्रांतिदिनीं शाहिद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. यात बंद केलेली पेन्शन विक्री योजना सुरु करावी, वर्ग ३,४ च्या कर्मचारी वर्गाला कालबद्ध पदोन्नत्या लागू करणे,२००५ नंतर बंद केलेली पेन्शन लागू करणे, आकृती बंद प्रस्तावानुसार नोकर भरती त्वरित करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जळगाव महानगर पालिका कामगार युनियन आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आदी संघटनाचाही या कामबंद आंदोलनात सहभाग होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अनिल नाटेकर, गुरुनाथ सैंदाणे, प्रफुल्ल पाटील आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Read More

जळगाव ;- प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार आज जिल्ह्यात ३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण ३ बाधित रूग्ण आढळले यात जळगाव शहरातून एक तर चाळीसगाव तालुक्यातून दोन असे रूग्ण आढळले आहे. जिल्हा कोरोना अहवालानुसार आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ४२ हजार ६३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २२ रूग्ण बरे होवून घरी परतले तर ३४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.

Read More

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- पाल हा किळसवाणा प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. या पालीच्या अनेक जाती आहेत. पण म्हणून कुणी पाली विकत घेत असेल अशी कल्पना करणे अवघड आहे. गीको नावाची पालीची एक जात अतिशय दुर्मिळ असून या पालीसाठी ४० लाख रुपये किंमत मोजण्याची तयारी असते हे नवल म्हणावे लागेल. ही पाल टॉकके असा आवाज काढते त्यामुळे तिला टॉके असेही म्हटले जाते. ही पाल अनेक गुणांनी युक्त आहे. तिचे मांस अनेक प्रकारच्या औषधी बनविण्यासाठी वापरले जाते. द. पूर्व आशियाई देशात या मांसापासून नपुसंगत्व, मधुमेह, एडस व कॅन्सरवरची पारंपारिक औषधे बनविली जातात. पौरुषत्व वाढविण्यासाठीही औषधे बनविली जातात. चीनमध्ये पारंपारिक चीनी…

Read More

चाळीसगाव – कल्याणचे माजी आमदार व भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पाच दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्याचा निमित्ताने दि.७ ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सह संयोजक अशोकराव चोरमले, महिला आघाडी प्रदेश संयोजक डॉ उज्वलाताई हाके, प्रदेश युवती संयोजक भाग्यश्री ढाकणे, उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यालय मंत्री राज खैरनार, विजाभज आघाडी जिल्हाध्यक्ष शालीग्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्कर राव पाटील,…

Read More

धरणगाव (प्रतिनिधी ) ;- धरणगावात शिवसंपर्क अभियानांतर्गत गाव तिथे शाखा, गाव तिथे बोर्ड, गाव तिथे शिवसैनिक शिवसंपर्क अभियानातून याला गती मिळाली आहे. आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव चालक-मालक संघटना (मालवाहतूक) शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सागितले कि चालक मालक संघटनेचा कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शिवसेना आपल्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे. असे ठाम पणे सागितले. यावेळी धरणगांव जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांच्या वाढदिवसा निमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;-शहरात वाहनांचे लहान मोठे अपघात होत असल्याच्या घटना दररोज कुठे ना कुठे घडत असून आज येथील अजिंठा चौफुलीजवळ असणाऱ्या ईदगाह कॉम्लेक्स समोरील रस्त्यावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ७७४७ ) हे दुभाजकावर जाऊन धडकल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान रविवार असल्याने फारशी वर्दळ नसल्याने वाहतुकीलाही फार खोळंबा झाला नाही. .

Read More

जळगाव – आगामी काळातील जळगाव जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने जळगाव ग्रामीणमध्ये पक्ष बळकटीकरणासाठी जळगाव ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे दौरे सुरु झाले आहे. जळगाव ग्रामीणमधील जळके, विटनेर येथून दौर्‍यांना सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे बळकटीकरणासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नविन कार्यकर्त्यांच्या जोडणीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावेरचे आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदिपभैय्या पाटील यांच्या आदेशान्वये काँग्रेस कमिटीचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी यांनी जळगाव ग्रामीण दौरे सुरु केले आहे. दौर्‍या दरम्यान जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत असून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जळगाव ग्रामीण येथील जळके, विटनेर तसेच म्हसावद-बोरनार गट पूर्ण…

Read More

खताने भरलेला ट्रक कलंडला ; सुदैवाने जीवित हानी टळली जळगाव (प्रतिनिधी) ;- शहरातील अजिंठा चौफुली ते ईच्छादेवी चौफुलीदरम्यान महामार्गावर असलेल्या नाल्याच्या पुलाजवळ शनिवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान खड्डा चुकवीत असताना रासायनिक खतांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे ट्रकचे एक्सल तुटून हजारोंचे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवाची हानी झाली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील कादर मोटर्स समोरील पुलावर केमिकल फर्टीलायझरने भरलेला ट्रक पलटी झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जिवितहानी टळली आणि मोठा अपघात होण्यापासून वाचला. परंतु या मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था आणि पुलाचे काम सुरु असूनही सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था न केल्याने या रस्त्यावर नेहमी अशा दुर्घटना होत असतात. प्रशासनाने याची गांभीर्याने…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीमध्ये अडकले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये गिरीश चौधरी हे अटकेत आहेत. तर एकनाथ खडसेंना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.

Read More

जळगाव (प्रतिनिधी );- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये व प्रशाळांसाठीचे येत्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे १ सप्टेंबर पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. देशातील कोवीड- १९चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत आनलाईन वर्ग सुरू राहतील . प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ६ आगस्ट पासून पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया आनलाईन/ आफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाईल. नवीन शैक्षणिक सत्राच्या परीक्षा १३ डिसेंबर २०२१…

Read More