खताने भरलेला ट्रक कलंडला ; सुदैवाने जीवित हानी टळली
जळगाव (प्रतिनिधी) ;- शहरातील अजिंठा चौफुली ते ईच्छादेवी चौफुलीदरम्यान महामार्गावर असलेल्या नाल्याच्या पुलाजवळ शनिवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान खड्डा चुकवीत असताना रासायनिक खतांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे ट्रकचे एक्सल तुटून हजारोंचे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवाची हानी झाली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील कादर मोटर्स समोरील पुलावर केमिकल फर्टीलायझरने भरलेला ट्रक पलटी झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जिवितहानी टळली आणि मोठा अपघात होण्यापासून वाचला. परंतु या मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था आणि पुलाचे काम सुरु असूनही सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था न केल्याने या रस्त्यावर नेहमी अशा दुर्घटना होत असतात. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाअजून किती नागरिकांच्या जिवाशी खेळणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=358327895760174&id=104245871168379