जळगाव – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २४ ऑगस्ट पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव (प्रतिनिधी ) ;-जळगाव जिल्हा, महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज 9 ऑगस्ट क्रांती दीना निमित्ताने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .या वेळी माजीमंत्री गुलाबराव देवकर ,रोहिनीताई खडसे ,जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील , सौ. मंगला पाटील, सौ. मीनाक्षी चौहान. संजय पवार, एजाज मलिक, वालमिक पाटील, नामदेव चौधरी, वाय एस महाजन, स्वप्नील नेमाडे, अशोक लाडवंजारी ,अशोक पाटील, संजय चौहान, सुनील माळी, सलीम इनामदार, मजहर पठाण, मौलाना साबरी, अनिरुद्ध जाधव, अशोक सोनवणे, किरण राजपूत, राहुल टोके, नामदेव पाटील. राजू बाविस्कर, आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव (प्रतिनिधी ) ;- जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुका स्तरावरून आलेली मदत आज कोकण पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड. भैयासाहेब रविंद्र पाटील यांनी संपूर्ण साहित्य कोकण वासियांपर्यंत पोहचवून देण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. रविंद्र पाटील यांनी गाडीला झेंडा दाखवत गाडी कोकणसाठी रवाना केली. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, सोपान पाटील, अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, कल्पनाताई पाटील,उमेश नेमाडे, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे , सौ.अर्चनाताई कदम, एजाजभाई मलिक, सलीमभाई इनामदार वाल्मीक मामा पाटील, राजेश पाटील, परेश कोल्हे, राजेंद्र…
जळगाव (प्रतिनिधी ) कोरोनाकाळात शरीराला पोषक जीवनसत्व पुरविणाऱ्या पावसाळी रानभाज्या महोत्सवाला मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला असून नागरिकांचा या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . या महोत्सवाला आ. राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजी विक्रेत्यांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
जळगाव (प्रतिनिधी ) ;-शहरातील आशादीप वसतीगृहातील एक ४० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. गणेश कॉलनी येथील आशादीप वसतीगृहात ४० वर्षीय महिला दाखल होती. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३वाजेच्या सुमारास ही महिला कोणाला काही एक न सांगता आशादीप वसतीगृहातून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने आशादीप वसतीगृहातील केअर टेकर सुनंदा नंदकिशोर पोतदारयांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज तडवी हे करीत आहेत. रंग गोरा, शरीराने सडपातळ, उंची पाच फुट, पाच इंच, अंगात पोपटी रंगाचे ब्लाऊज, टिकल्याची साडी, हातभर बांगड्या, हनुवटीवर…
जळगाव (प्रतिनिधी ) सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणी साठी आज ९ ऑगष्ट क्रांतिदिनीं शाहिद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. यात बंद केलेली पेन्शन विक्री योजना सुरु करावी, वर्ग ३,४ च्या कर्मचारी वर्गाला कालबद्ध पदोन्नत्या लागू करणे,२००५ नंतर बंद केलेली पेन्शन लागू करणे, आकृती बंद प्रस्तावानुसार नोकर भरती त्वरित करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जळगाव महानगर पालिका कामगार युनियन आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आदी संघटनाचाही या कामबंद आंदोलनात सहभाग होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अनिल नाटेकर, गुरुनाथ सैंदाणे, प्रफुल्ल पाटील आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
जळगाव ;- प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार आज जिल्ह्यात ३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण ३ बाधित रूग्ण आढळले यात जळगाव शहरातून एक तर चाळीसगाव तालुक्यातून दोन असे रूग्ण आढळले आहे. जिल्हा कोरोना अहवालानुसार आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ४२ हजार ६३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २२ रूग्ण बरे होवून घरी परतले तर ३४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- पाल हा किळसवाणा प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. या पालीच्या अनेक जाती आहेत. पण म्हणून कुणी पाली विकत घेत असेल अशी कल्पना करणे अवघड आहे. गीको नावाची पालीची एक जात अतिशय दुर्मिळ असून या पालीसाठी ४० लाख रुपये किंमत मोजण्याची तयारी असते हे नवल म्हणावे लागेल. ही पाल टॉकके असा आवाज काढते त्यामुळे तिला टॉके असेही म्हटले जाते. ही पाल अनेक गुणांनी युक्त आहे. तिचे मांस अनेक प्रकारच्या औषधी बनविण्यासाठी वापरले जाते. द. पूर्व आशियाई देशात या मांसापासून नपुसंगत्व, मधुमेह, एडस व कॅन्सरवरची पारंपारिक औषधे बनविली जातात. पौरुषत्व वाढविण्यासाठीही औषधे बनविली जातात. चीनमध्ये पारंपारिक चीनी…
चाळीसगाव – कल्याणचे माजी आमदार व भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पाच दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्याचा निमित्ताने दि.७ ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सह संयोजक अशोकराव चोरमले, महिला आघाडी प्रदेश संयोजक डॉ उज्वलाताई हाके, प्रदेश युवती संयोजक भाग्यश्री ढाकणे, उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यालय मंत्री राज खैरनार, विजाभज आघाडी जिल्हाध्यक्ष शालीग्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्कर राव पाटील,…
धरणगाव (प्रतिनिधी ) ;- धरणगावात शिवसंपर्क अभियानांतर्गत गाव तिथे शाखा, गाव तिथे बोर्ड, गाव तिथे शिवसैनिक शिवसंपर्क अभियानातून याला गती मिळाली आहे. आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव चालक-मालक संघटना (मालवाहतूक) शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सागितले कि चालक मालक संघटनेचा कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शिवसेना आपल्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे. असे ठाम पणे सागितले. यावेळी धरणगांव जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांच्या वाढदिवसा निमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील…

