जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 32.8 टक्के वाढ जळगाव (प्रतिनिधी):- या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 32.8 टक्के वाढ नोंदवण्यात आली. भारतातील ठिबक व तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या प्रथम क्रमांकाची तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने 10 ऑगस्ट रोजी घेतलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2021-22च्या पहिल्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजूरी दिली व ते जाहीर करण्यात आले. विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की, जागतीक पातळीवर कंपनीकडे 3804 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हातात आहेत. आर्थिक वर्ष 2021-22च्या पहिल्या तिमाहीचे ठळक वैशिष्ट्ये:- – एकत्रित करश्चात नफा 13.4 कोटी रुपये – एकत्रित कर,व्याज व घसाराकरपूर्व नफा 263.8 कोटी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव (प्रतिनिधी ) ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या असून कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे ठरले असताना परीक्षेसाठी नवीन प्रक्रिया राबविली गेली का ? अशा विविध प्रश्नांसाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ई वायुनंदन यांची आज भेट घेण्यात आली . यावेळी अतुल कदमबांडे ,कुणाल पवार, शिवराज पाटील, विजय पाटील, रोहन सोनवणे ,आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती करताना विद्यापीठ कायदा २०१६ नुसार कलम १४ (५ ) नुसार प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रा. डॉ. मधुलिका सोनावणे यांची नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र हि नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- एटीएममध्ये पैसै नसल्याने अनेकदा ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र या त्रासापासून आता ग्राहकांची मुक्ती होणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आदेश जारी करत एटीएममध्ये पैसे नसलेल्या संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असे स्पष्ट केले आहे. १ ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केले. आरबीआयने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएममध्ये वेळोवेळी पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास बँकांवर १० हजारांची दंडात्मक कारवाई केली जाईल. एटीएममध्ये कॅश उपलब्धतेबाबत आरबीआयने सर्व बँक अध्यक्ष,…
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला काल नाशिक येथून अटक करण्यात आली होती. झंवर आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे अवसायक जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने सदर पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाइट तयार करून गुप्त कटातील साथीदार सुनील झंवर व त्याच्या फर्मच्या नावे बेकायदेशीररित्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार…
जळगाव -राज्याच्या साहित्यिक क्षेत्रात अमूल्य योगदान आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या अपूर्व साहित्य निर्मितीतून जीवन जगण्याचे सार सांगणाऱ्या कवियीत्री, खान्देश कन्या तथा निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक 2012 रोजी सुमारे तीन एकर जागेत आसोदा या त्यांच्या जन्मगावी मंजूर करण्यात आले होते.मात्र गेल्या नऊ ते दहा वर्षापासून या स्मारकाच्या कामाला आजपावेतो आवश्यक गती मिळालेली नाही. यामुळे खान्देशासह राज्यातील साहित्यिकांमध्ये नाराजीची वाढली असून खानदेशात बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाबाबत होत असलेली उपेक्षा मनाला वेदना देणारी आहे. याबाबत आपण आग्रही भूमिका घेत स्मारकाची उपेक्षा थांबवावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या…
जळगाव/धुळे/नंदुरबार : महावितरणच्या लातूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन दिवटे लिखित ‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ या पुस्तकाचे प्रकाशन महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड मुंबई येथे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विजय सिंघल यांच्यासह संचालक (संचालन), संजय ताकसांडे, संचालक (वित्त) रविंद्र सावंत, संचालक (प्रकल्प / मानव संसाधन) भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, मुख्य महाव्यवस्थापक (तां.आ.) भरत जाडकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे हे उपस्थित होते. डॉ. मोहन दिवटे यांनी लिहिलेले ‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ हे पुस्तक मुक्तरंग प्रकाशन लातूरतर्फे प्रकाशित करण्यात आले असून सदर पुस्तकास महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगत सिंह कोश्यारी…
जळगांव(प्रतिनिधी ) ;-कोल्हे हिल्स परिसरात फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी बोलावून त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा पळवून नेणाऱ्या २ भामट्याना तालुका पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केल्याची कारवाई करून कॅमेरा हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षकांनी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या कारवाईबाबत कौतुक केले आहे. स्वराज संजय ठाकुर वय १९ रा न्यु लक्ष्मी नगर, अजय राजु चव्हाण वय २० ,रुपेश गणेश साळवे वय १८ दोन्ही रा न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार अशी तीन आरोपींची नावे आहेत. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुका पोलीस स्टेशन गु र नं २३२/२०२१ भा दं वि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल असुन यातील फिर्यादी सिध्देश कृष्णा महाजन…
जळगाव ;- जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे येथील भूमिहीन शेतकऱ्याने आमरण उपोषण आरंभिले असून दाखल न घेतल्यास अन्न त्याग आणि जलत्याग करणार असल्याचे शेतकरी अरुण भास्कर पाटील यांनी बोलताना दिली .आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणस्थळी अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याचे अरुण पाटील यांनी सांगितले. तसेच कुटुंबियांना इच्छा मरणाची परवानगी राष्ट्रपतींनी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जळगाव (प्रतिनिधी) भाईदास हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणी अखेर मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सुनील झंवर याला अटक केल्याने या घोटाळ्याचे धागेदोरे कुणापर्यंत जाऊन पोहचले आहे याचा उलगडा होणार आहे. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर त्याने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत वॉरंट रद्द केले असून त्याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला मिळवून घेतला होता. भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर पाच मार्चला पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण आला.…
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाने घोषित केलेला पहिला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ व विविध कार्य गौरव पुरस्कार आणि कवयित्री बहिणाबाई यांचेवरील व्याख्यानाचा कार्यक्रम बुधवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ विषाणू प्रादूर्भाव लक्षात घेऊन मर्यादित संख्येच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उर्वरित व्यक्तींकरिता दूरदृष्य प्रणाली व्दारा (ऑनलाईन पध्दतीने)…

