• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिक्षकांनी अद्ययावत शिक्षण आत्मसात करण्याकडे लक्ष द्यावे – प्रा.आर.एस.माळी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 18, 2021
in शैक्षणिक, जळगाव
0
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १ सप्टेंबरपासून प्रारंभ

जळगाव I प्रतिनिधी

शिक्षण पध्दतीत दिवसेंदिवस बदल होत आहेत हे बदल स्वीकारून शिक्षकांनी अद्ययावत शिक्षण आत्मसात करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.आर.एस.माळी यांनी केले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मानव संसाधन केंद्र व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस येथे ‘रोल ऑफ टिचर्स ईन अकेडमिक, रिर्सच अॅण्ड इंडस्ट्री’ या विषयावर ऑनलाईन रिफ्रेसर कोर्सचे आयोजन दि.१७ ते ३० ऑगस्ट, २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रा.आर.एस.माळी बोलत होते. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची ऑनलाईन अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ.सचिन सुर्वे, कबचौउमविचे माजी प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे, प्रा.आर.एस.बेंद्रे, समन्वयक प्रा.डी.एस.दलाल उपस्थित होते.

प्रा.आर.एस.माळी म्हणाले की, अकॅडमीक संशोधन हे केवळ विद्यापीठापुरते मर्यादीत न राहता औद्योगिक क्षेत्र व समाज उपयोगी पडेल असे असावे. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस प्रशाळेने रि फ्रेसर कोर्स आयोजित केल्या बद्दल समाधान व्यक्त केले. प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी विद्यापीठ कायदा, युजीसी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्श आहे. त्यामुळे वर्गात शिकविण्यापुरतेच शिक्षकांचे काम आता राहिले नूसन विद्यार्थ्यांना सर्व गुणांनी परिपूर्ण बनविणे महत्वाचे आहे. या ऑनलाईन रिफ्रेसर कोर्सला महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, राज्यस्थान, पंजाब आदी राज्यातून ३६ प्राध्यापक सहभागी झाले आहेत. यावेळी प्रा.डी.एस.मोरे यांनी प्रशाळेची माहिती दिली. प्रास्ताविक प्रा.डी.एस.दलाल यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.पवन बाविस्कर यांनी केले. प्रा.अमरदिप पाटील यांनी आभार मानले.

Previous Post

रोटरीचे जळगाव ड्रिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेश मेहर यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला दिली भेट

Next Post

जिल्ह्यातील चाळीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण करावे – खा. उन्मेश पाटील

Next Post
जिल्ह्यातील चाळीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण करावे – खा. उन्मेश पाटील

जिल्ह्यातील चाळीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण करावे - खा. उन्मेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group