घराघरातून मिळणाऱ्या पाठिंब्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण जळगाव (प्रतिनिधी):जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना प्रभाग क्रमांक ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, उत्स्फूर्त स्वागत आणि थेट संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.प्रभागातील विविध भागांत सुरू असलेल्या प्रचार फेऱ्या, घरभेटी आणि कॉर्नर सभांमधून जयश्री राहुल पाटील विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत असून, स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत आहेत. नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि महिलांसाठी सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासाचा मुद्दा मतदारांना भावताना दिसत आहे.प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मतदारांचा वाढता ओढा पाहता, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिकच बळावला असून ‘प्रभाग…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगावच्या तापी महामंडळाच्या अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस तक्रारजळगाव: माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीमध्ये चक्क बनावट पावती पुस्तके आणि खोटी , अपूर्ण कागदपत्रे पुरवून शासनाची व जनतेची दिशाभूल केल्याचा गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता श्रेणी-१ श्री. निलेश दे. बाविस्कर यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अजय बढे यांनी तक्रार दिली आहे.नेमके प्रकरण काय?जळगाव येथील कंत्राटदार श्री. अजय भागवत बढे यांनी मौजे आव्हाणी (ता. धरणगाव) येथील ‘बोदवड परिसर उपसा सिंचन योजने’ अंतर्गत २०१७ ते २०२४ या कालावधीत झालेल्या वाळू उपसा, वाहतूक आणि गौण खनिज खरेदीबाबत माहिती मागवली होती. यापूर्वी याच विषयावर…
महापालिका रणसंग्राम…जळगाव – शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक ७ मध्ये उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ रविवारी सकाळी करण्यात आला. गणेश कॉलनीतील गुरुदेव दत्त मंदिर परिसरात सकाळी १० वाजता नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ झाला. या वेळी आमदार राजूमामा भोळे तसेच दिनकर गुरुजी उपस्थित होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक ७ मध्ये अ मधून दीपमाला मनोज काळे, ब मधून अंकिता पंकज पाटील आणि क मधून विशाल सुरेश भोळे हे बिनविरोध निवडून निश्चित झाले आहेत. मात्र प्रभाग ड मध्ये अत्तरदे हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे. आमदार राजूमामा…
जळगाव – महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १९ ब मधील निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार विक्रांत (गणेश) सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या समोर उभे राहिलेले तीन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने विक्रांत सोनवणे यांचा विजय निर्विवाद ठरला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. या विजयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांची रणनीती महत्त्वाची ठरली आहे. दोघांनी मिळून केलेल्या राजकीय खेळीमुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बिनविरोध निवडणुकीमुळे शिवसेनेच्या संघटनशक्तीला बळकटी मिळाली आहे. शिवसेनेने अलीकडच्या काळात विविध ठिकाणी बिनविरोध निवडणुकीचा धडाका लावला आहे. ही रणनीती…
महापालिका रणसंग्रामजळगाव – महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग २ (अ) मधून शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार शिवसेना सागर शामकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या समोर उभे राहिलेले अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने विक्रांत सोनवणे यांचा विजय निर्विवाद ठरला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. या विजयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांची रणनीती महत्त्वाची ठरली आहे. दोघांनी मिळून केलेल्या राजकीय खेळीमुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बिनविरोध निवडणुकीमुळे शिवसेनेच्या संघटनशक्तीला बळकटी मिळाली आहे.
विजय पाटील जळगाव – महापालिका निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपली संघटनशक्ती आणि रणनीती सिद्ध केली आहे. प्रभावी 19 मधून शिवसेनेच्या उमेदवार रेखा चुडामन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून स्थानिक राजकारणात हा पक्षासाठी मोठा विजय मानला जात आहे. या विजयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांची आखलेली रणनीती महत्त्वाची ठरली आहे. दोन्ही नेत्यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवत विरोधकांना मैदानाबाहेर ठेवण्यात यश मिळवले. परिणामी, रेखा पाटील यांच्यासमोर असलेल्या एकमेव अपेक्षा उमेदवाराने अर्ज माघार घेतला मुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. शिवसेनेने महापालिका निवडणुकीत आतापर्यंत चार उमेदवारांना बिनविरोध विजय मिळवून दिला आहे. या सलग यशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे…
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोंडाईचा नगरपंचायतीच्या निवडणुकीत ज्या पद्धतीचा पॅटर्न राबवण्यात आला होता, तोच पॅटर्न आता जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत राबवला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाकडून साम-दाम-दंड-भेद या नीतीचा उघडपणे वापर करून उमेदवारांसह सूचक व अनुमोदकांवर दबाव आणण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपशी संबंधित काही टोळक्यांकडून विरोधी पक्षांच्या उमेदवारांकडे तसेच त्यांच्या सूचक व अनुमोदकांकडे थेट भेटी देऊन माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. काही ठिकाणी पैशांचे अमिष दाखवून सूचक व अनुमोदकांना उमेदवारी अर्जातून माघार घ्यावी, यासाठी…
विजय पाटील जळगाव- महापालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत भाजपने बिनविरोध उमेदवारांची सुरूवात करून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले होते. त्यानंतर शिवसेना पक्षाने आघाडी घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, या घडामोडीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरणात शिवसेनेने आपला ठसा उमटवला आहे.चौधरी यांच्या समोर अपक्ष उमेदवार राहूल लोखंडे यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक लढत थेट संपुष्टात आली. परिणामी चौधरी यांचा विजय निश्चित झाला असून, ते चौथ्यांदा महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत. यापूर्वी तीन वेळा त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागातील विकासकामांना गती दिल्याची नोंद…
गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड जळगाव – महापालिका निवडणुकीत भाजपचा काल एक उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर आज शिवसेना पक्षाचा उमेदवार झाला आहे. चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मयूर चंद्रशेखर सोनवणे यांची 18 ‘अ’ मधून अर्ज मागे घेतल्याने गौरव सोनवणे यांची निवड निश्चित झाली आहे. मयूर सोनवणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव सोनवणे हे एकमेव प्रतिस्पर्धी उमेदवार होते. मात्र, अर्ज मागे घेतल्याने गौरव सोनवणे यांची निवड बिनविरोध झाली आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.…
विजय पाटील :जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक रंगत आली असताना जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मागील साईडला गोलाणी मार्केट परिसरात एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गोलानी मार्केट परिसरात एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे तर संबंधित जखमी तरुणाला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

