काबुल (वृत्तसंस्था ) : अफगाणिस्तानमधील परिस्थिती वेगाने चिघळत असून देश अनागोंदीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आता तालिबान्यांनी देशातील दुसरे मोठे आणि महत्वाचे शहर असलेल्या कंदहारवर कब्जा मिळवल्याचं स्पष्ट झाले आहे. आता ज्या वेगाने तालिबानी दहशतवादी एक-एक प्रदेशावर कब्जा मिळवत आहेत ते पाहता त्यांच्यासाठी आता राजधानी काबुल दूर नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. तालिबान्यांनी कंदहारवर कब्जा मिळवल्यानंतर आता ते काबुलकडे कूच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तालिबान्यांनी अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करु नये, असेही सांगितले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगाला वाटत…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जामनेर;- शहरातील पद्मावती ड्रायफूट व नमकीन दुकानात चोरीच्या प्रयत्नात आलेल्या चार जणांना जामनेर पोलीसांनी अटक केली आहे. चौघांकडून दोन दुचाक्या आणि चोरी करण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. गुरूदयाल सिंग मनजीत सिंग टाक रा. तांबापुरा जळगाव, विशाल सजन चव्हाण रा. हरीविठ्ठल नगर जळगाव, विकास रवींद्र कोळी रा. हरी विठ्ठल नगर जळगाव आणि रवी प्रकाश चव्हाण तांबापुर जळगाव अशी चारही संशयितांची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी की, जामनेर शहरात मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शहरातील नगर भागातील पद्मावती व नमकीन या दुकानात चोरी करण्यासाठी चार चोरटे दुचाकीने आले. त्याचवेळी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीसांनी काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यात. त्यावेळी दुकानात…
मुंबई (वृत्तसंस्था ) – कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे मुंबईमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिअंटमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीमधील एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिअंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता. डेल्टा व्हेरिअंटमुळे मुंबईमधील या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती ११ ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कॉनटॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णामधील जिनोम सिक्वेन्सींगच्या अभ्यासामध्ये सात जणांना डेल्टा प्लस व्हेरिएटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेने डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या…
सहारनपूर (वृत्तसंस्था ) : निवडणूक आयोगाच्या वेबसाइट हॅक प्रकरणी आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. अटकपूर्वी आरोपीने १०,००० हून अधिक बनावट मतदार ओळखपत्रे तयार केली होती. उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सहारनपूरचे एसएसपी एस चेनप्पा म्हणाले की, आरोपी विपुल सैनीने नकुड भागातील त्याच्या कम्प्युटरच्या दुकानातून हॅकिंग केले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी विपुल सैनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वापरलेल्या पासवर्डद्वारे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर लॉग इन करत असे. याबाबत आयोगाला संशय आला आणि तपास यंत्रणांना माहिती दिली. यंत्रणांच्या तपासादरम्यान सैनी संशयाच्या भोवऱ्यात आला आणि त्यांनी सहारनपूर पोलिसांना सैनीबद्दल माहिती दिली. एसएसपी चेनप्पा म्हणाले, “चौकशीदरम्यान सैनीने सांगितले की, तो…
मुंबई (वृत्तसंस्था ) ;- पृथ्वीसाठी धोकादायक असलेल्या लघुग्रहांमध्ये समावेश होत असलेल्या बेन्नू या लघुग्रहाचीपृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के एवढीच असल्याची माहिती अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये उभ्या असलेल्या 102 मजली एम्पायर स्टेट बिल्डिंग या गगनचुंबी इमारतीएवढा बेन्नूचा आकार आहे. ही टक्कर होण्याची शक्यता गृहीत धरलीच, तर 24 सप्टेंबर 2182 हा दिवस पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीवर धडकला, तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकेल. त्या टकरीमुळे पृथ्वीवर लघुग्रहाच्या आकाराच्या 10 ते 20 पट आकाराचं विवर तयार होऊ शकेल, असं अधिकारी लिंडली जॉन्सन यांनी सांगितलं. पृथ्वीनजीकच्या…
मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) ;- मुक्ताईनगर येथे शासकीय विश्रामगृह येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रमुख पाहुणे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव आकाश धनगर ,कुणाल कोल्हे, कोमल पाटील, जिल्हा समन्वयक योगेश कोळी ,निर्मल भालेराव ,भावेश रोहिमारे, नयन पाटील हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक अ.फ.भालेराव हे होते. यावेळी युवा परिषदेच्या तालुका पदाधिकाऱ्यांना प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील , जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव कोमल पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच साहित्यिक अ. फ. भालेराव यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष निलेश मेढे यांनी…
जळगाव (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली असतांना त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असून बँकेला ईडीची नोटीस प्राप्त झाल्याच्या चर्चेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची मुबई येथील ईडीच्या कार्यालयात सायंकाळी चौकशी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील एका खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात सक्त वसूली संचालनालय अर्थात ईडी विभागाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान जिल्हा बँकेला ही नोटीस प्राप्त झाल्याच्या माहितीने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.…
जळगाव ;- जिल्ह्यात प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज ११ रोजी जिल्ह्यात ३ रुग्ण आढळले असून ४ जण बरे होऊन घरी परतले आहे. तसेच २५ जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही .
जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांचा पत्रकार परिषदेत आरोप जळगाव (प्रतिनिधी ) शहर महापालिकेत प्रलोभने दाखवून सत्तांतर झाले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत एकाच कुटुंबातील दाम्पत्य असलेल्या विरोधी पक्ष नेता आणि महापौर पद असणे लज्जास्पद असल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला असून नैतिकतेच्या आधारे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी डॉ. चौधरी यांनी केली आहे. विरोधी पक्षनेतेपदी राहून सुनील महाजन यांनी नैतिकता बासनात गुंडाळली आहे. हे जनतेच्या हितासाठी नाही . सत्तेत शिवसेना आहे . मग विरोधी पक्षनेतेपदी असताना जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर आवाज उठविला आहे. मनपातील कोणता प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे का ? समितीमध्ये महापौरांचा…
मुंबई (वृत्तसंस्था ) सध्या एकाच वेळी अनेक संकटाचा सामना १८,००० एसटी बसचा ताफा असणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ करत आहे. डिझेलसाठी पैसे नसल्यामुळे रद्द केलेल्या एसटी बसवर असणाऱ्या चालक आणि वाहकांना रजा घेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप युनियनने केला आहे. गणेशोत्सवासाठी हजारो प्रवासी जाण्यासाठी रांगेत उभे असतानाही, गेल्या काही महिन्यांपासून पगाराच्या विलंबामुळे एसटी कामगारांना पैशांची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे. संथ गतीने सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबद्दल कामगार संघटना चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वेतन विलंबित आहे. पुढचा पगार कधी येईल हा प्रश्न नेहमीच असतो. बस चालवण्यासाठी डिझेलला पैसे नाहीत आणि यामुळे बस रद्द झाल्यावर कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यास सांगितले…

