Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्याच्या लोककलावंत निवड समितीत विनोद ढगे
    राजकारण

    राज्याच्या लोककलावंत निवड समितीत विनोद ढगे

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनिधी ) लोककलावंना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शासन विविध स्तरावर विचार करत आहे. त्या अनुषंगाने लोक-कलावंताद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून त्याला आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यस्तरावर लोककलावंत निवड समितीची स्थापना केली आहे. त्यात जळगावचे प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत तथा खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांची सदस्यपदी निवड झाली.
    समितीत राज्यभरातून लोककलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञांचा समावेश असून त्यात जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर या जिल्ह्यातील लोककलावंताची निवड व पडताळणी करून शासनाच्या या मदतीपासून कुठलाही लोककलावंत वंचित रहाणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील कलावंताच्या संख्येनुसार प्रत्येक कलावंताला ५ हजार रुपयांची कोविड जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. जिल्हयातील जे कलावंत या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छितात त्या कलावंतानी आपली नावे समिती सदस्यांकडे नोंदवावी.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांच्याच नावाची आमची मागणी; बच्चू कडूंची भूमिका वैयक्तिक – उदय सामंत

    June 8, 2026

    लघुशंकेच्या वादातून तरुणाचा खून; फरार प्रियकर-प्रेयसी मध्यप्रदेशातून जेरबंद

    June 8, 2026

    जामनेर-बोदवड मार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू, १३ जण जखमी

    June 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.