Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर
    जळगाव

    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 19, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने विशेष आरोग्य शिबीरासह आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे संरक्षण आणि कायदे,आपात्कालीन कार्य, वन्यजीव जनजागृती, कोरोना विषयक जनजागृती व लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

    रावेर आणि यावल तालुक्यातील गारखेडा, उसमळी, जामन्या, गाडऱ्या आणि लंगडाआंबा या भागातील आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन बुधवारी सातपुडा विकास मंडळ, पाल संचलित जामन्या येथील आश्रमशाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख हे होते. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, अँड. सागर चित्रे, विजय दर्जी, शरद न्हायदे, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील, नायब तहसीलदार आर. डी. पाटील सहायक पोलीस निरीक्षक पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कार्यक्रमाच्या सुरूवातीस बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांनतर गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी व कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

    जंगलात सर्पदंश झाल्यास करावयाचा आपात्कालीन प्रथमोपचार या विषयावर सर्पमित्र जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, गौरव शिंदे, कल्पेश तायडे यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य विषयक योजनांची माहिती ग्रामीण रूग्णालय, पालचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी. बी. बारेला यांनी दिली.

    या शिबिरात जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. बारेला यांनी स्थानिक पावरा भाषेत नागरिकांना मार्गदर्शन करून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन या गावातील अनेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

    या गावांमध्ये अगोदर आदिवासी बांधव लस घेण्यास तयार नव्हते, त्याच गावातील नागरिकांनी यावेळी याठिकाणी लस घेतली हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरल्याचे डाॅ. बारेला यांनी सांगितले. या नागरिकांना मुख्य अधिपरिचरिका सौ. कल्पना नगरे व परिचारिका शाबजान तडवी यांनी लस दिली.

    कार्यक्रमास जामन्याचे पोलीस पाटील, सत्तरसिंग बारेला, सरपंच काशिनाथ बारेला, माजी सरपंच भरत बारेला, प्रताप बारेला, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष व मानद सचिव रवींद्र फालक, अधीक्षक रविद्र ठाकूर. वनपाल ललित सोनार, लालसिंग बारेला, तेरसिंग बारेला, भरत बारेला, दारासिंग बारेला, बिर्ला बारेला, देवसिंग बारेला आदी उपस्थित होते.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रमेश साबळे, प्राथमिक मुख्याध्यापिका हेमलता सावकारे, एम. डी. नरवाडे, प्रवीण चव्हाण, एस.पी. नामायते, अधीक्षक सुभाष गाढे, एन. व्ही. ढाके, अनिल तडवी, राजेंद्र कांचोळे, मामाज पवार, राजेंद्र पाटील, गीरासिंग बारेला,, गणेश प्रजापती, कस्तुरा बारेला, निलेश बारेला, वीरेंद्र बारेला, जमेला तडवी, विठ्ठल मेढे यांनी घेतले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बाळकृष्ण देवरे यांनी मानले.

    आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉ बी. बी. बारेला, डॉ सचिन पाटील, डॉ. भोईटे, डॉ. ठाकरे, मुख्य अधिपरिचारिका सौ. कल्पना नगरे, अधिपारीचारक अरिहंत पाटील, औषध निर्माता पी. एम. पाटील, परिचारिका राबजान तडवी, गोविंद पवार यांच्यासह ग्रामीण रुग्णालय. पाल व प्राथमिक आरोग्य केंद्र. सावखेडा ता. यावल येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती डॉ बारेला यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगावमध्ये भाजपचा उत्साहपूर्ण प्रचार दौरा; प्रभाग ६ मध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद

    November 16, 2025

    विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या; खान्देशात घडली धक्कादायक घटना !

    November 16, 2025

    महिलांनी केले अश्लील हावभाव : चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात !

    November 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.