Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव,;- कठोरा, ता. जळगाव येथील गावठाण विस्ताराबाबत शासन नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत. कठोरा, ता. जळगाव येथील गावठाण विस्ताराबाबत आढावा बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जळगावचे प्रांताधिकारी प्रसाद मते, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र चव्हाण, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, सरपंच सौ. सत्वशील पाटील, उपसरपंच सरलाबाई सपकाळे, डॉ. सत्वशील पाटील, रामचंद्र…

Read More

जळगाव;- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 7 नुसार, 15 ऑगस्ट, 2021 रोजी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र सद्य:स्थितीत कोविड-19 विषाणूच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपायोजना राबविण्याकामी शासन व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक ते निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 11 ऑगस्ट, 2021 रोजीचे ‘ब्रेक द चेन’ सुधारीत मार्गदर्शक सूचना आदेशान्वये कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी वैधनिक सभेचे/ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत नागरिकांची अनावश्यकरित्या गर्दी होण्याची शक्यता आहे. याकरीता अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा…

Read More

जळगाव;- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनलॉकचे नवीन नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार अनेक क्षेत्रांमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथील करण्यात येतील याचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज अनलॉकचे नवीन नियम जाहीर केले आहेत. यात खालील प्रकारे शिथीलता मिळणार आहे. १) उपहारगृहे / बार – खुल अथवा बंदिस्त उपहारगृहे बैठक क्षमतेच्या ५०% क्षमतेने खालील अटी व शर्ती नुसार सुरु राहतील. अ) ग्राहकांना उपहारगृह / बार मध्ये प्रवेश करतांना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत चेहर्‍यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.…

Read More

जळगाव;- दरवर्षी जागतिक कौशल्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याकरिता जिल्हास्तर, विभागीयस्तर आणि राज्यस्तरावर परिक्षा होवून निवड झालेल्या उमेदवारांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. यावर्षी दिनांक 17 व 18 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्हास्तरावर, दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी विभागीय स्तरावर आणि दिनांक 3 ते 5 सप्टेंबर, 2021 दरम्यान राज्यस्तरावर स्पर्धा घेण्याचे निश्चित झालेले आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता 15 ऑगस्ट, 2021 पर्यंत “महास्वयंम” पोर्टलवरील लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या स्पर्धा घोषीत कार्यक्रमानुसार होतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी “महास्वयंम” पोर्टलवरील लिंकव्दारे स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क…

Read More

जळगाव;- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम रविवार, 15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमास जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, वीरपिता तसेच कोरोनायोध्दा डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांनी उपस्थित राहावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी मास्क परिधान करणे व सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.यादिवशी सकाळी 8.30 ते 9.35 वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा…

Read More

जळगाव ;-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या वतीने विद्यापीठातील त्यावेळच्या तौलनिक भाषा विभागाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. तेजपाल चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच स्वातंत्र्याच्या सुवर्णमयी वर्षानिमित्त अकरा दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन प्रशाळेच्या हिंदी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात रविवार दिनांक १५ऑगस्टला होईल तर समारोप बुधवार दिनांक २५ ऑगस्टला होईल. झूम मिटींग ॲप वर दररोज सकाळी १०.३० ते १२.०० वाजेपर्यं व्याख्यान होणार असून या व्याख्यानमालेचे थेट प्रक्षेपण युटयुब वर प्रक्षेपित होईल. सलग चालणाऱ्या या व्याख्यानमालेत मा. डॉ. विश्वास पाटील, शहादा रामचरितमास: एक परिक्रमा, डॉ. श्रीराम परीहार, खंडवा, मध्य प्रदेश मानवीय मूल्यों…

Read More

हार्मोनिका वादन, गीतगायनाने आली कार्यक्रमात रंगत जळगाव – भुसावळ येथील सर्जन डॉ.आशुतोष केळकर आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुजाता केळकर हे दाम्पत्य आता पुण्याला स्थायिक होत असल्याने गोदावरी फाऊंडेशनतर्फे हृदयस्पशी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, मोमेन्टो देवून सन्मानित करण्यात आले. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात मंगळवार, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी हृदयस्पर्शी निरोप समांरभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ.सुरेंद्र भिरुड हे होते. व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डी.एम.कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील, डीयुपीएमसीचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर उपस्थीत…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;- एका ८५ वर्षीय मुरलीधर शंकर निकुंभ रा. महाबळ कॉलनी जळगाव यांचे एक महिन्याचे फ्रॅक्चर होते. रुग्णाचे वय ८५ असल्याने व त्यांना ह्रदयाचा आजार , फुफुसाचा आजार असल्याने त्यांच्यावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया हाय रिस्क असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले होते. मात्र श्री. गुलाबराव देवकर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांनी हा धोका पत्करून उजव्या खुब्याचा बॉलचे बदल सिमेंटेड मॉड्युलर बायपोलार यांचे सांधेरोपण करून दिले. मुरलीधर निकुंभ यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वॊकरच्या साहाय्याने चालविण्यात आले. ५ व्या दिवशी कुणाचेही सहकार्य न घेता स्वतः चालत गेले . याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफ चे आभार मानत दुसर्यावर…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;- विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये नागपंचमी साजरी करण्यात आलि कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया समन्वयीका स्वाती अहिराव सांस्कृतिक विभाग प्रमुख भारती अत्तरदे यांनी सरस्वती पूजन व सर्प वारुळाचे पूजन करून केली. इयत्ता पहिली ते पाचवी चे विद्यार्थी कार्यक्रमाला झूम ॲप द्वारे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना नागपंचमीचे महत्व असणारे व्हिडिओ दाखविण्यात आले. त्यानंतर शाळेचे प्राचार्य श्री अमित सिंह भाटिया यांनी मुलांना नागपंचमीची छान कथा सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला भादूपोता यांनी केले. तर आभार प्रदर्शन अर्चना पाटील यांनी केले कार्यक्रमाची तांत्रिक बाजू निलेश बडगुजर यांनी सांभाळली. तरी या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे…

Read More

जळगाव: जिल्ह्यातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण करावे, स्वतःला सक्षम बनवावे या उद्देशाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्यवृत्ती योजना जून २००८ मध्ये जाहीर करण्यात आली. “गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे” या उद्दात्त ध्येयपुर्तीकरिता जळगाव येथील सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना (एसडी-सीड) अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना २०२१ साठी जाहीर करण्यात आली आहे. उपक्रमाची ध्येयपूर्तीकडे वाटचाल · मागील तेरा वर्षात १४,३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ · एकूण ३,४५० हून अधिक विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण · ४१,८०० हून अधिक विद्यार्थ्यांना…

Read More