जळगाव ;- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी किशोर लोखंडे (वय २२) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. वैष्णवी लोखंडे ही समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज पाठीमागे राहत होती. वैष्णवी अभ्यासामध्ये हुशार होती. ती नेहमी सर्वांशी मनमिळावूपणे वागायची, असे तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले. तिचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. सीएमओ डॉ. नीता भोळे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत. मृत वैष्णवीच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव ;- केंद्र सरकारने गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ केली आहे. या महागाईविरोधात आज जळगावमधील टॉवर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी गॅस सिलेंडरला हार चढवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गॅस दर वाढ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले होते. मात्र, अच्छे दिन न येत महागाईत वाढ झाली असल्याचा आरोप महिला आघाडी महानगरध्यक्षा मंगला पाटील यांनी केला. गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ मागे घेतली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी पुढे सांगितले. यानंतर टाॅवर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत…
जळगाव ;- यावल तालुक्यातील दहीवद येथील व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३० हजाराची ऑनलाईन फसवणूक करणारेदोन भामट्याना सायबर पोलीसांनी अटक केली आहे.संशयित आरोपी सुनिल कुमार सहानी पिता ब्रम्हदेव उर्फ अनिल कुमार वय-३८ रा. गुनाबस्ती पोस्ट तेजपूर जिल्हा समस्तीपुर (बिहार), कन्हैय्या सहानी पिता राजेंदर सहानी वय-४३ रा. बेलीया घाट मेन रोड कलकत्ता यांना अटक केलेल्यांची नावे आहेत . यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी कालीदास विलास सुर्यवंशी वय-३३ रा. दहीगाव ता. यावल जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. १८ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान एका अनोळखी नंबरवरून फोन येवून आशितोष कुमार असे बनावट नाव सांगून उज्जवला गॅस एजन्सीची…
जळगाव ;- विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे प्राथमिक व माध्यमिक विभागात दिनांक २१/०८/२०२१ वार शनिवार रोजी रक्षाबंधन निमित्त ऑनलाइन झूम ॲप च्या माध्यमातून इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यानी बनवलेल्या राख्यांचे ” राखी प्रदर्शनी” चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील सर यांना राखी बांधून करण्यात आली. तसेच प्रदर्शनी चे उद्घाटन मा. मुख्याध्यापक सरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून सुरेख राख्या बनवल्या. राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. रक्षण करणे हा धर्म आहे. या वाक्यांप्रमाने वृक्ष आपले संरक्षण करत आले आहेत आपण अस्तित्वात आहोत…
जळगाव ;- राखी एक प्रेमाचं प्रतीक राखी एक विश्वास आहे हाच विश्वास रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर ,जळगाव येथे इ. २ रीच्या विघार्थ्यांनी दाखविला. घरी राहून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणानिमित्त टाकाऊ पासून टिकाऊ कसे तयार करावे याचेच एक उदाहरण म्हणून सुंदर अशा राख्या तयार केल्या या राख्यांमध्ये विद्यार्थ्यांनी स्ट्रॉ, कापूस, दोरा, लोकर, रंगीत मणी या अशा विविध सामानापासून राख्या तयार केल्या . या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे दोन उद्देश सफल झाले एक म्हणजे घरातील निरुपयोगी वस्तूंपासून आपणही एक चांगली व उपयोगी बनवू शकतो व दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील यांनी केले.…
मुंबई ;- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे. विमल अग्रवाल नावाच्या हॉटेल व्यावसायिकानं दाखल केलेल्या तक्रारीत परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाझ भाटी यांची नावं नमूद केली आहेत. या सर्वांविरोधात खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान आरोपींनी विमल अग्रवाल यांच्याकडून ९ लाख रुपये रोख आणि सॅमसंगचे दोन महागडे फोन खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप करण्यात आला…
जळगाव ;- दरवर्षी श्रावण पौर्णिमेला विश्व संस्कृत दिवस साजरा करण्यात येतो. पोदार इंटरनॅशनलस्कुल जळगाव, येथे विश्व संस्कृत दिवस व रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगाचे औचीत्य साधून पोदार इंटरनॅशनलस्कुलचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी श्री सरस्वती पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या संस्कृत विभाग प्रमुख सौ.किर्ती पाटील यांनी केले.यावेळी उपस्थित शिक्षकांनी सामाजिक अंतर राखून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरवात इ.९ वी ची विद्यार्थिनी कु.अदिती वाघ हिने संस्कृत मधील प्रार्थनेने केली.ओवी महाजन इ.८ वी च्या विद्यार्थिनीने संस्कृत भाषणातून या प्राचीन भाषेची महत्ता वर्णन केली.४००० वर्षांचा इतिहास असलेल्या संस्कृत भाषेला देवभाषा…
जळगाव ;- जळगाव जिल्हा पोलीस दलातील आपल्या सहकारी महिलेला अश्लील मेसेज पाठविणाऱ्या मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबलला सायबर पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे . नरेंद्र वाारुळे असे संशयित अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. एका महिलेच्या नावाने इतरांना अश्लील मॅसेज पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी कारवाईचे आदेश दिले होते. या अनुषंगाने सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत एका महिला तक्रारदाराच्या तक्रारीवरून ४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविषयी सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे व सहकार्यांनी याची कसून चौकशी केली. सदर गुन्ह्याच्या तपासात मोबाइल…
पोलिसात गुन्हा दाखल, माजी महापौरांच्या हस्ते पुतळा दहन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनजळगाव, दि.२० – देशातील प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची तुलना तालिबान्यांशी करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जळगावात याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शनीपेठ पोलीस ठाण्यात नगरसेवक कैलास सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला असून सायंकाळी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे पुतळा दहन करण्यात आला. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.शायर मूनव्वर राणा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महर्षी वाल्मिकी यांना दरोडेखोर संबोधत त्यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे. तसेच ‘आपके लोग किसी को भी भगवान बना देते है’ असे म्हणून त्यांनी समस्त हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या…
जळगाव प्रतिनिधी ;- जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये ट्रक्टर व टॉलीची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण चोरी केलेल्या ९ ट्रॉल्या आणि १ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून आज्ञात टोळी ट्रक्टर व ट्रॉलींची चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी गुन्हयाचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करून संजय धनगर (वय-४२) रा. नरवेल…

