जळगाव प्रतिनिधी;- घरासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून धूमस्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी २० ग्राम किमतीची मंगलपोत लांबवितयाची घटना बुधवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी गुन्हाच दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रेमनगरात असलेल्या सप्तशृंगी माता मंदिराच्या मागे बेंडाळे नगरात प्रतिमा विवेक काटदरे वय ५२ या वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दूध घेण्यासाठी दुचाकीने गणेश कॉलनीत गेल्या. दूध घेऊन पुन्हा घरी परतल्या घराच्या गेटसमोर उभे असताना विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने काटदरे यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची वीस ग्रॅमची मंगळपोत तोडून नेली. काही कळण्याच्या आत संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी प्रतिमा काटदरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
नवी दिल्ली – देशातील कोरोना लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. कारण, देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आता लवकरच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस देण्यात येणार आहे. या वयोगटातील देशात मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना ही लस दिली जाईल. डीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना केंद्र सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले कि, देशात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत, त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू…
देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी 46 हजार 280 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 34 हजार 242 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 605 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 56 दिवसानंतर कोरोनाच्या नवीन प्रकरणात वाढ झाली आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी 46 हजार 781 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे, केरळ राज्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. राज्यात बुधवारी 31 हजार 445 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, 20 हजार 271 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 215 लोकांचा मृत्यू आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 19.03 टक्के आहे. देशात कोरोना…
धरणगाव ;- जिल्ह्यात २६ पोलीस निरीक्षक आणि सहाय्य्क निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून आज धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी यांच्याकडून स्वीकारला. यावेळी नूतन पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनाही निरोप दिला.
जळगाव ;- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे व क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरो, जळगाव यांच्यावतीने जळगाव जिल्ह्यात 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान जागर यात्रा फिरणार आहे. जळगाव जिल्ह्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. येणारे वर्षभर अमृत महोत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनस्तरावर करण्यात येणार आहे. कोविडचे संकट अजुन संपलेले नाही. त्यामुळे कोविडच्या सर्व नियमांचे…
जळगांव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित स्व.डॉ.तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचा बुधवारी समारोप झाला. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, केंद्रीय हिंदी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अनीलकुमार शर्मा, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.योगेश पाटील, समीक्षक डॉ. दिनेश चौबे, विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चौबे यांनी भारतीय संदर्भात तुलानात्मक साहित्य यावर भाष्य केले. तुलनात्मक साहित्य हे भारतीय अस्मितेला जीवंत ठेवते. नवीन संदर्भ आणि नवीन रूप यांची सांगड घालून तुलनात्मक साहित्य नवीन संदर्भांना जन्म देते. असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. अनीलकुमार शर्मा म्हणाले की, डॉ.तेजपाल चौधरी यांनी…
जळगाव ;- लहानपणापासूनच मिळेल ते काम करण्याची आवड… सतत काहीतरी नविन शिकण्याची जिज्ञासा…या जिज्ञासेतूनच १४० रुपये रोजाने कामासाठी येणार्या गणेश कोळी या तरुणाने वेळेचा सदुपयोग करत थेट पीएसआय पदापर्यंत घेतलेली झेप ही निश्चितपणे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. जळगाव तालुक्यातील खिर्डी या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले शालिक कोळी ह्यांचा एकुलता एक मुलगा गणेश कोळी हे आज जळगावातील सायबर सेल विभागात पीएसआय म्हणून कार्यरत आहे. पीएसआयपर्यंतच्या या प्रवासाबाबत गणेश कोळी यांनी गोदावरी साप्ताहिकाशी दिलखुलास संवाद साधला. गणेश कोळी यांनी संवाद साधतांना सांगितले की, माझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट मी ठरवून केली नाही, सर्वकाही अनपेक्षितपणे घडत गेले आणि त्याचा स्विकार मी केला. लहानपणापासून…
जळगाव ;- डॉ. निलेश गोविंद किनगे इंटरवेंशनल न्यूरॉलॉजिस्ट ऍक्सऑन ब्रेन हॉस्पिटल हे जळगावातील सुप्रसिध्द मेंदूरोग तज्ञ असून त्यांच्या रुग्णालयात दिनांक १४ रोजी पाचोरा येथील वनराज समाधान भोई वय -38 वर्षे यांना अचानक पने डोकेदुखी आणि चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले . त्यामुळे तात्काळ त्यांना डॉक्टर निलेश किनगे यांच्या रुग्णालयात आणण्यात आले . यांनी तात्काळ रुग्णाचा सि.टी. स्कॅन करण्यास सांगितले . सि.टी. स्कॅन केल्यानंतर रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेला दिसून आला . त्यानुसार रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले त्यानंतर यांनी रुग्णाच्या मेंदूची अँजिओग्राफी केली असता त्यामध्ये रुग्णाच्या मेंदूमध्ये व्हाइडनेक अनुरीझम आढळला त्यातून रक्तस्त्राव होऊन रुग्णाला लकवा झाला . डॉक्टर…
धरणगाव;- तालुक्यातील पाळधी दुरक्षेत्र पोलिस स्टेशन मंजुर असुन नविन पोलिस चौकी बांधण्या व स्टाॅप वाढवणे व नविन वाहणे बाबत ना.दिलिप वळसे पाटील ग्रृहमंत्री यांना मागणी चे निवेदन रा.का.पाटीॅ. जिल्हाध्यक्ष अरविंद माकरी यांनी दिले. पाळधी ता.धरणगांव येथिल पाळधी व परीसरातिल वर्दळ लक्षात घेता पाळधी दुर क्षेत्र पो.स्टे.ला स्टाॅप वाढवण्यांची.,मंजूर दुरक्षेत्र चौकीच्या बांधकाम सुरु करण्या बाबत ,नविन पोलिस वाहण मिळण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली. या निवेदनात कमी पोलिसांच्या कमी संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था टिकण्यासाठी व कर्मचारी याचा तान कमी करण्यासाठी व पाळधी हद्दीत नॅशनल हायवे १४कि.मि. हद्द असल्यांने व बांभोरी पाळधी दोन मोठी गांवे व ईजिनिअरगि काॅलेज असल्यांने ते करावी अशी…
जळगाव ;- केंद्रीय मंत्र्यानी केलेल्या वक्तव्याचा आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे कि, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खा. राहुल गांधी यांच्याबाबत असभ्य शब्द वापरले. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीतही बेजबाबदार वक्तव्य केले. या दोन्ही मंत्र्यांचा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध व्यक्त करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शहर जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे, शहर अध्यक्ष प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे,जाकीर बागवान,दीपक सोनवणे, मुजीब पटेल, योगेश देशमुख, शफी बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

